Air wing C sakal
नागपूर

‘एअर विंग सी’ प्रमाणपत्र प्रशिक्षण नागपुरातून

सरकारी पक्षाची उच्च न्यायालयात माहिती; संत्रानगरीसाठी खुशखबर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भाची शान असलेल्या नागपूर फ्लाइंग क्लबमध्ये ‘एअर विंग सी प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. डायरेक्टोरेट जनरल ऑफ नॅशनल कॅडेट कोअरने या योजनेला मंजुरी दिली आहे, असेही नमुद करण्यात आले. या बाबत सुमेधा घटाटे व इतरांनी दाखल केलेली जनहित याचिका नागपूर खंडपीठामध्ये प्रलंबित आहे.

या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्या समक्ष सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्या पक्षातर्फे ही माहिती न्यायालयाला देण्यात आली. तत्पूर्वी, डेप्युटी चीफ फ्लाइंग इन्स्ट्रक्‍टर (सीएफआय) यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती न्यायालयाला सरकारी पक्षातर्फे देण्यात आली.

फक्त त्यांची गुणवत्ता तपासणी प्रक्रीया बाकी असून लवकरच ती पूर्ण केल्या जाईल, असेही नमूद केले. नागपूर फ्लाइंग क्लब सुरु करण्यासाठी डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचे तत्काळ लायसन्स मिळणे आवश्‍यक आहे. यासाठी केलेल्या अर्जाला अद्याप मंजुरी मिळाली नाही, असेही सरकारी पक्षाने नमूद केले. ही मंजुरी मिळाल्यानंतर हे प्रशिक्षण सुरु होईल. पुढील सुनावणी चार आठवड्यांत निश्‍चित केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अँड. श्रीनिवास देशपांडे यांनी, शासनातर्फे अँड. एन. आर. पाटील, ॲड. मुग्धा चांदुरकर यांनी बाजू मांडली.

‘एअर विंग सी प्रमाणपत्रा’चे अनेक फायदे

सुमारे २० तास यशस्वी उड्डाण केलेल्या प्रशिक्षणार्थीला ‘विंग सी सर्टिफिकेट देण्यात येत. हे प्रमाणपत्र व्यावसायिक पायलट, लढाऊ पायलट म्हणून लायसन्स मिळविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. तसेच, एअरफोर्समध्ये थेट प्रवेशाचा मार्गसुद्धा यामुळे खुला होईल, अशी माहिती सरकारी पक्षातर्फे न्यायालयाला देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT