The airline refuses to refund customers
The airline refuses to refund customers 
नागपूर

विमान कंपनीचा हेकेखोरपणा कायम; प्रवासी आक्रमक, जाणून घ्या संपूर्ण प्रकार

योगेश बरवड

नागपूर  ः कोरोना संकटामुळे रद्द झालेल्या विमानाच्या तिकिटांचे पैसे परत मिळावे यासाठी नागपूरकर प्रवाशांचा विविध पातळ्यांवरून लढा सुरू आहे. केंद्रीय मंत्र्यांसह विविध विभागांनीही या प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेत योग्य निर्णय घेण्याची सूचना केली होती. यानंतरही विमान कंपनीने हेकेखोरपणा कायम ठेवत पैसे परत करण्यास नकार दिला आहे. याप्रकाराने प्रवासी आक्रमक झाले आहेत.

विमान कंपन्यांकडे असंख्य ग्राहकांसह नागपूरचे हरिहर पांडे यांनी बुक केलेल्या ‘गो-एअर'च्या ५० ग्रुप तिकिटांचे १३ हजार ४७५० रुपये अडकून आहेत. त्यांनी २३ जुलैचे नागपूर ते मुंबई विमानाचे तिकीट काढले होते. आपली रक्कम परत मिळावी म्हणून पांडे यांनी 'लोक शिकायत'च्या माध्यमातून केंद्रातील विविध मंत्रालयांकडे गो एअरच्या कारभाराची तक्रार केलेली होती. त्यात राष्ट्रपती सचिवालय, पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्री, नीती आयोग, हवाई वाहतूक मंत्रालय, हवाई वाहतूक महासंचालनालय, पर्यटन मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, विधी मंत्रालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव आदींचा समावेश आहे. 

केंद्रीय मंत्री, खासदारांचे पत्र 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खासदार कृपाल तुमाने यांनी गो-एअर'ला पत्र लिहिले होते. त्याची दखल विमान वाहतूक मंत्रालयाने घेत महासंचालनालय कार्यालयात अधिक माहितीसाठी पाठविली होती. तिथून गो-एअरच्या अधिकाऱ्यांकडे ही तक्रार निर्णयासाठी वर्ग करण्यात आली. या सर्वच पत्रांना गो-एअर नोडल अधिकारी नेहा वर्मा यांनी पैसे परत करता येणार नाही, असे सांगितले आहे. त्याऐवजी क्रेडिट शेल देण्यात आले असल्याचे पांडे यांच्यासह संबंधित विभागांना कळविण्यात आहे. यामुळे विमान कंपन्यांकडून पैसे परत मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

'पत हमी'वर कोणी कर्ज देणार का..?

कोरोनामुळे पुढे वर्षभर कोणीही विमानप्रवास करणे टाळणार हे नक्की आणि त्यातल्या त्यात ग्रुपने प्रवास जवळपास अशक्यच आहे. प्रवाशांना पैसे परत करणे ही जबाबदारी जशी बुकिंग करणाऱ्यांची आहे, तशीच गो-एअरची सुद्धा आहे. ज्याप्रमाणे कोणत्याही क्रेडिटवर कर्जपुरवठा मिळतो, त्याप्रमाणे विमान कंपन्यांच्या या क्रेडिट शेलवर कोणी कर्ज देणार का? असा प्रश्न पांडे यांनी 'सकाळ'सोबत बोलताना उपस्थित केला. गो-एअर' रक्कम परत देण्यास नकार देत आहे, त्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही पांडे यांनी केली. 

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT