Ajit pawar esakal
नागपूर

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री पवारांना नाही स्वतंत्र बंगला! रविभवनातच व्यवस्था; दोन उपमुख्यमंत्र्यांमुळे अडचण

अजित पवारांसाठी स्वतंत्र बंगल्याची सोय नसून रविभवनमधील कॉटेजमध्येच त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नीलेश डोये

Nagpur : मुख्यमंत्र्यांप्रमाणेच उपमुख्यमंत्री यांच्यासाठी स्वतंत्र शासकीय बंगला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच दोन उपमुख्यमंत्र्यांची पदे निर्माण झाली. त्यामुळे नव्याने उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलेल्या अजित पवारांसाठी स्वतंत्र बंगल्याची सोय नसून रविभवनमधील कॉटेजमध्येच त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्याच्या राजकारणात गेल्या साडेतीन वर्षात अतिशय नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सत्तास्थापन करीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन, तीन दिवसांतच चक्र फिरले. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेत आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तर उपमुख्यमंत्री पद पुन्हा अजित पवारांकडे आले. त्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. भाजपसोबत सत्ता स्थापन केली.

उपमुख्यमंत्री पवारांना नाही स्वतंत्र बंगला

यावेळी उपमुख्यमंत्री पद भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करून आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते सामिल झाले. यावेळीही त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे राज्यात उपमुख्यमंत्र्यांची दोन पदे झाली.

नागपुरात मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी हे शासकीय निवासस्थान आहे. तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरीचा बंगला आहे. हा बंगला देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांसाठी एकच शासकीय निवासस्थान आहे. दोन उपमुख्यमंत्री झाल्याने प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे.

राष्ट्रपती दौऱ्याच्या वेळी त्यांच्यासाठी रविभवन येथील एक कॉटेज राखीव ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी स्वतंत्र बंगलाच नसल्याचे सध्या तरी चित्र आहे.

आतापर्यंत राज्यात झाले नऊ उपमुख्यमंत्री

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री पदाची निर्मिती करण्यात आली. राज्यात १९७८ मध्ये प्रथम उपमुख्यमंत्री पदाची निर्मिती करून नाशिकराव तिरपुडे यांच्याकडे हे पद आले. त्यानंतर आतापर्यंत नऊ जणांकडे उपमुख्यमंत्रपदाची धुरा आली. यात सर्वाधिक पाच वेळा उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे राहिले.

यातील तीन वेळा उपमुख्यमंत्री पद त्यांना याच साडेतीन वर्षाच्या काळात मिळाले. दोनदा छगन भुजबळ उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होते.

कॉटेज करणार तयार!

नागपुरातील देवगिरी बंगला देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला असून त्यांच्याकडून येथे एक कार्यालयही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे फडणवीस नसताना अजित पवार आल्यास त्यांना हा बंगला देता येणार नाही. त्यामुळे एक कॉटेजच त्यांच्यासाठी तयार करण्याच्या तयारीत बांधकाम विभाग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुजरातच्या हातात महाराष्ट्राचं राजभवन! कोण आहेत नवीन राज्यपाल आचार्य देवव्रत? सीपी राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यानंतर निर्णय

Latest Marathi News Updates : निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात तुंबळ हाणामारी

Crop Insurance: थकीत पीकविम्यापोटी १९० कोटी जमा करा; खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश, चार आठवड्यांची मुदत

Pimpri Chinchwad: बीआरटी स्थानके अंधारात; मद्यपींचा वावर, दिवे बंद असल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

Sangli Crime:' िसमकार्ड हॅक करून पोलिसदादांनाही हॅकर्सकडून गंडा'; धक्कादायक प्रकार उघडकीस

SCROLL FOR NEXT