Ajnit murder on suspicion of immoral relationship Attack with knife and rod 
नागपूर

अनैतिक संबंधाच्या संशयातून अजनीत खून; चाकू व रॉडने हल्ला

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून करण्यात आलेल्या हल्ल्यात जखमी कंत्राटदाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अजनी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. अमर शेळके (वय ३५) असे मृताचे नाव आहे. नितेश मस्के (वय २५, रा. चंद्रनगर) व त्याचा साथीदार सुनयन अमरीश खर्चे (वय २५, रा. गजानननगर) व दोन साथीदार, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अमर यांचे बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय नितेश याला होता. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. २ मार्चला त्याने अमर याला चंद्रनगर येथे घरी बोलाविले. अमर व त्याची पत्नी नितेश याच्या घरी गेले. यावेळी सुनयन व अन्य दोघेही नितेश याच्या घरी होते. नितेश याने अमर याच्याशी वाद घातला. वाद विकोपाला गेला.

नितेश व त्याच्या साथीदारांनी अमर याच्यावर चाकू व रॉडने हल्ला केला. अमर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमी अमरला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अजनी पोलिसांनी प्राणघातक हल्लयाचा गुन्हा दाखल करून नितेश व सुनयन या दोघांना अटक केली. दरम्यान, शनिवारी उपचारादरम्यान अमर याचा मृत्यू झाला. त्यानंतर अजनी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Cheating Wife : गर्लफ्रेंडसोबत मलेशियाला जाण्याचा प्लॅन; पत्नीला सांगितले बिझनेस ट्रिप, विमानतळावरच बिंग फुटले, पुण्यातील उद्योगपतीचा कारनामा

Asian Games: भारताच्या लेकींचा धुमाकूळ! एलावेनिलचे दुहेरी यश, तर सचिकाचे MMA मध्ये पदक पक्के अन् क्रिकेटमध्येही वाजवला डंका

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

गणरायाला निरोप देताना आक्रित घडलं! कृत्रिम तलावात शॉक लागून १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू; लेकाचा मृतदेह पाहून वृद्ध वडिलांचा आक्रोश

ASTROLOGY: या ३ तारखांना जन्मलेले लोक असतात कुबेराचे लाडके? धन-दौलत, प्रॉपर्टीच्या बाबतीत मिळतो भाग्याचा साथ; तुमची जन्मतारीख कोणती?

SCROLL FOR NEXT