नागपूर

Akola Crime: धक्कादायक! धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन तरुणाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, तरुणाचा मृत्यू

जिल्ह्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत दानापूर येथे गाडीचा धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. १७) समोर आली.

सकाळ डिजिटल टीम

Hivarkhed Akola Murder over Small Conflict: जिल्ह्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत दानापूर येथे गाडीचा धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. १७) समोर आली.

देवानंद उत्तम वानखडे (वय २८, राहणार दानापूर) हा युवक मोटर सायकलने बाहेरगावी जात असताना दानापूर येथील एका चौकात त्याच्या गाडीचा धक्का एका महिलेस लागला. त्यावरून तेथे वाद व बाचाबाची झाली, परंतु देवानंद तेथून पुढे निघून गेला.

गाडीचा धक्का लागल्याचा आकस ठेवून अनेक आरोपींनी १६ फेब्रुवारी रोजी रात्री दानापूर माळेगाव रोडवरील झोपडपट्टी जवळ देवानंदला गाठून लाट्याकठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. देवानंदच्या वडिलांनी त्याला तात्काळ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. तेथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

हिवरखेड पोलिसांनी पाचही आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली. आरोपींमध्ये सिद्धार्थ आनंदा वाकोडे, कैलास भास्कर सावळे, आनंदा श्रावण वाकोडे, आशाबाई आनंदा वाकोडे, रमाबाई कैलास सावळे या पाच आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्यावर हत्या केल्याप्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास हिवरखेडचे ठाणेदार गोविंदा पांडव, पोलिस उपनिरीक्षक श्रीराम जाधव, निलेश खंडारे, प्रफुल्ल पवार, श्रीकृष्ण सोळंके आणि सहकारी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: धक्कादायक! गर्भवती महिलेचं लैंगिक शोषण अन् साप...; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

SCROLL FOR NEXT