Alert in schools about Corona infection, letters of instruction gone 
नागपूर

कोरोना संसर्गाबाबत शाळांमध्येही अलर्ट, गेले सूचनांचे पत्र

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे त्यावर खबरदारीचा उपाय असल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी गुरुवारी (ता.12) शाळांना पत्र काढून सूचना दिल्या. विशेष म्हणजे यासाठी आरटीई ऍक्‍शन समितीने यासाठी उपसंचालकांना निवेदन सादर केले होते. विद्यापीठानेही यापूर्वी महाविद्यालयांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

चीनसह 24 देशांत कोरोना विषाणूचे संक्रमण झाले. भारतात सातत्याने रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या विषाणूवर कुठलेही औषध नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजनेने आजाराचे संक्रमण थांबविता येणे शक्‍य आहे. शहरातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. अभय मुद्‌गल यांनी प्राचार्य आणि विभागप्रमुखांना पत्र पाठविले होते. सात तारखेला विद्यापीठाला "कोरोना' विषाणूचे संक्रमण होऊ नये यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना सूचना दिलेल्या आहेत. याच सूचनांचा आधार घेत, विद्यापीठाने महाविद्यालयांसह विभागांना कुठल्याही परिषदा, चर्चासत्रे, कार्यशाळा घेण्याचे टाळण्याचा सल्ला दिला होता. आता शालेय शिक्षण विभागाने सूचना काढून राज्यातील सर्व उपसंचालकांना विभागातील शाळांना सूचना देण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपसंचालकांनी पत्र काढून कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी काळजी घेण्याच्या दृष्टीने सूचना केलेल्या आहेत.

अशा आहेत सूचना

स्वयंस्वच्छतेसह परिसर स्वच्छ ठेवणे, वारंवार हात धुणे, शिंकणे आणि खोकलताना तोंडावर रुमाल धरणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, आजारी असताना गर्दीत न जाणे आणि शाळेत जाऊ नये, इतरांच्या वस्तू वापरू नये, आजारी व्यक्तींच्या संपर्कात जाऊ नये, शाळेत विद्यार्थी आजारी वाटल्यास त्यास घरी पोहोचवून देण्याची व्यवस्था करावी, विद्यार्थ्यांना शाळेत येताना मास्कची सक्ती करू नये, टिश्‍यू पेपरचा वापर करावा.

अभ्यासमंडळाच्या बैठका रद्द

बुधवारी चर्चासत्र, कार्यशाळा आणि परिषदा रद्द करण्याचे आदेश विद्यापीठाने दिले असता, गुरुवारी विद्यापीठाने दररोज होणाऱ्या अभ्यासमंडळाच्या बैठकाही रद्द करण्याची घोषणा केलेली असल्याचे पत्र काढले आहे. यात केवळ अभ्यासमंडळच नव्हे तर तदर्थ समिती आणि विशेष समितीच्या बैठकांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT