hammer.jpeg 
नागपूर

"त्या' युवकांच्या संपर्कात येणारे 12 कर्मचारीही क्वारंटाइन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पार्वतीनगर येथील 22 वर्षीय मृत कोरोनाबाधित युवकाच्या संपर्कात येणाऱ्या मेडिकलमधील 12 कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन केल्याची माहिती मेडिकलच्या अधिष्ठातांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. मेडिकलचे नोडल अधिकारी रुद्रेश चक्रवर्ती यांनी अधिष्ठातांतर्फे शपथपत्र दाखल केले. कोरोना आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रुग्णाला योग्य उपचार मिळावे म्हणून सुभाष झंवर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

दाखल शपथपत्रानुसार, पार्वतीनगर येथील 22 वर्षीय युवकाला 5 मे रोजी सकाळी गंभीर स्थितीमध्ये मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. कर्तव्यावर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तत्परतेने तपासले. या दरम्यान अधिकाऱ्यांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी मास्क लावले होते. रुग्णाची परिस्थिती बघता लवकरात लवकर उपचार मिळणे गरजेचे होते. त्यामुळे, त्यांना हॅण्डग्लोज परिधान करता आले नाही. त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या या अधिकाऱ्यासह इतर कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला स्ट्रेचरवर ठेवले आणि पुढील उपचारासाठी बाह्यरुग्ण विभागात नेले. तेथे इतर डॉक्‍टरसुद्धा उपस्थित होते. त्या डॉक्‍टरांनी त्या रुग्णाला मृत घोषित केले. उपचारादरम्यान त्याठिकाणी पाच डॉक्‍टर, सहा परिचारिका आणि एक कर्मचारी उपस्थित होता. हे सर्व रुग्णाच्या संपर्कात आल्याने मेडिकलच्या व्यवस्थापनातर्फे त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

यापूर्वी झालेल्या सुनावणीत रॅपिड ऍन्टीबॉडी टेस्टबाबत राज्य सरकारला विचारणा केली होती. परंतु, महाराष्ट्र सरकारने रॅपिट टेस्ट किट्‌स मागितल्याच नसल्याचे आयसीएमआरच्या शपथपत्रात नमूद केले होते. तेव्हा यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया येथील लॅबसाठी आवश्‍यक उपकरणे खरेदी करून ते उपलब्ध करून देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आयसीएमआरला दिलेत होते. त्यानुसार, मेडिकलच्या अधिष्ठातांनी विदर्भातील वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध असणाऱ्या साठ्याबाबत उच्च न्यायालयाला माहिती देत तो साठा पुरेसा असल्याची माहिती दिली. तसेच, गरज पडल्यास राज्य शासनाकडे त्या त्या वस्तूंची मागणी केल्या जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT