All todays exams canceled by Nagpur University 
नागपूर

नागपूर विद्यापीठाकडून आजच्या सर्व परीक्षा रद्द; परिपत्रक काढून दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार होती. मात्र, पहिल्याच दिवशी तांत्रिक समस्येमुळे परीक्षांपासून वंचित राहण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. सकाळी सुरू झालेल्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना बराच मन:स्ताप सहन करावा लागला. सकाळी आठ वाजताचा पेपर दुपारपर्यंत झाला नाही. यानंतर विद्यापीठाने आजचे सर्व पेपर रद्द केल्याचे जाहीर केले. 

विद्यापीठाद्वारे गुरुवारी सकाळपासून चार सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील पहिल्या सत्रात सकाळी ८ ते ११ वाजतादरम्यान बी.कॉम. अंतिम वर्षातील पाचव्या सेमिस्टरमधील फायन्सिअल अकाऊंट विषयाचा पेपर होता. तसेच बीबीए, बीसीए याही अभ्यासक्रमाचे पेपर होते. मात्र, सकाळपासून बहुतांश विद्यार्थ्यांना इंटरनेटअभावी लॉगीन करता आले नाही. ११ वाजेपर्यंत पेपरच सोडविता येत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला. 

या विद्यार्थ्यांनी थेट महाविद्यालय गाठून तक्रार नोंदविली. यानंतर सकाळी ११.३० वाजता बीएस.स्सी.च्या पाचव्या सेमिस्टरचा भूगर्भशास्त्र, सांख्यिकी यासह विज्ञान शाखेच्या विविध विषयांचे पेपर घेण्यात आले. तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यातही विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. संकेतस्थळावर क्लिक केले असता, अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेट स्पीड नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे विद्यार्थी हैराण झाले.

समस्या सुटत नसल्याचे पाहून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाद्वारे परीक्षा रद्द केल्याचे पत्रक काढण्यात आले. गुरुवारच्या सर्व पाळीतील सर्व विषयाच्या परीक्षा तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्या आहे. या परीक्षांची पुनर्निधारित तारीख नंतर घोषित करण्यात येईल, असेही यात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT