Medical College 
नागपूर

Medical College : इमारतीचा नकाशा 50 वर्षांपूर्वी मंजूर, तरी नर्सिंगचे वर्ग होस्टेलमध्येच

केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आता पासष्ट वर्षांचे झाले. त्यावेळी मेडिकल कॉलेजचे वर्ग सदरमध्ये भरायचे. याच दरम्यान मेडिकलमध्ये जनरल नर्सिंग स्कूल सुरू झाले. नर्सिंग स्कूलसाठी स्वतंत्र इमारतीचा नकाशा मेडिकलची इमारत तयार होतानाच मंजूर झाला, तशी मेडिकलच्या नकाशात नोंद आहे. नकाशात इमारत मंजूर आहे. परंतु, पन्नास वर्षे लोटल्यानंतरही भूखंड मात्र मोकळाच आहे.

या भूखंडावर गायी-म्हशी चरताना दिसतात आणि नर्सिंग अभ्यासक्रमातील प्रशिक्षणार्थी परिचारिका मात्र पन्नास वर्षांपासून वसतिगृहांच्या (होस्टेल) खोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे घेत आहेत. जेवणाच्या खोल्यांना वर्गखोल्या बनवण्याचे अफलातून काम संबधित प्रशासनाने केले. परंतु, पन्नास वर्षे स्वतंत्र इमारतीची खबरबात लागू दिली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचे, तर मध्यभारतामध्ये पहिल्या क्रमांकाचे रुग्णालय अशी मेडिकलची ओळख आहे. या मेडिकलच्या बांधकामाचा नकाशा 1958 मध्ये मंजूर झाला. नकाशात नर्सिंग अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र इमारत मंजूर आहे. जागेची निवड निश्‍चित केली आहे. वर्गखोल्यांची इमारत तयार करण्यापूर्वी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे बांधकाम झाले.

यामुळे नर्सिंगच्या पहिल्या तुकडीने वसतिगृहातच प्रशिक्षण घेऊन परिचर्या अभ्यासक्रम पूर्ण केला. परंतु, त्यानंतर वसतिगृहाच्या समोर असलेल्या मोकळ्या भूखंडावर नर्सिंगची स्वतंत्र इमारत तयार होणे आवश्‍यक होते. तसे प्रस्ताव मेडिकल प्रशासनाकडून शासनाकडे पाठवणे आवश्‍यक होते. परंतु, चालढकल वृत्तीमुळे मंजूर नकाशातील इमारत तयार करण्याचा प्रस्तावच पन्नास वर्षांत तयार झाला नाही. आणि संबधित विभागाने प्रस्ताव करून शासनदरबारी पाठपुरावादेखील केला नाही.

सलग पंचेचाळीस वर्षे जनरल नर्सिंग अभ्यासक्रम होस्टेलमध्ये (वसतिगृहात) सुरू राहिले. नकाशात मंजूर इमारत नकाशातील कागदावरच आडव्या उभ्या रेषांमध्ये बंदिस्त राहिली. इमारतीला दगड विटांचा आकार आलाच नाही. मेडिकल प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे हे उदाहरण आहे, हे मात्र निश्‍चित. पन्नास वर्षांत मंजूर नकाशात असलेल्या स्वतंत्र इमारतीच्या बांधकामाच्या विषयावर आज मात्र मेडिकल प्रशासन बोलण्यास टाळाटाळ करीत आहेत. पुढे जनरल नर्सिंग स्कूल बंद झाले.

2006 पासून नर्सिंग अभ्यासक्रमात गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी मेडिकलमध्ये बीएससी नर्सिंग कॉलेज सुरू झाले. परंतु, बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाची पहिली तुकडीही नर्सिंगच्या वसतिगृहात प्रशिक्षण घेऊ लागली. आजही बीएससी नर्सिंगचेही वर्ग याच वसतिगृहाच्या इमारतीमध्ये होत आहेत.

सहा वर्षांपासून बीएससी नर्सिंगचे प्रशिक्षणार्थी वसतिगृहाच्या इमारतीमध्ये शिक्षण घेत असताना येथील एका खोलीत वसतिगृह तयार करण्यात आले. जेवणाची मेसही येथे सुरू झाली. विद्यमान प्रशासनानेही नकाशातील मंजूर इमारत तयार करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Thane: भिवंडीच्या विकासाला नवी दिशा! घराणेशाहीला नकार; बदलाच्या राजकारणाला मतदारांची साथ, काँग्रेसचा शिलेदार उपमहापौरपदी विराजमान

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

SCROLL FOR NEXT