Ambadas Danve statement Only 7 percent industry Vidarbha development nagpur esakal
नागपूर

Ambadas Danve : विदर्भामध्ये केवळ ७ टक्केच उद्योग; अंबादास दानवे

अंबादास दानवे यांची विधानपरिषदेत माहिती : विदर्भाचा विकास नाही

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी विदर्भासाठी ४१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. मात्र, विदर्भाचा विकास झाला नाही. विदर्भातील उद्योग बाहेर गेले.

राज्यात ३६ हजारांपेक्षा अधिक उद्योग असताना विदर्भात केवळ अडीच हजार अर्थात ७ टक्के उद्योग आहेत, अशी माहिती विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. निमित्त होते विदर्भाचा अनुशेष या विषयावर २६० अन्वये सुरू असलेल्या चर्चेचे.

यावेळी दानवे म्हणाले, ‘‘गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केले, असा सवाल वारंवार विचारला जातो. अडीच वर्षे कोरोनाची साथ होती. परंतु त्यापूर्वीची पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, हे विसरता येणार नाही.

फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी विदर्भासाठी ४१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. मात्र, या पॅकेजची अंमलबजावणी झाली की नाही हे तपासणे आवश्यक आहे. अनुशेषावर फक्त बोलले जाते.

त्याबाबत गांभीर्य असते तर गोसेखुर्दसारखा प्रकल्प इतकी वर्षे रखडला नसता’’, असेही त्यांनी नमूद केले.

समृद्धी महामार्गाचे श्रेय एकट्याचे नाही

समृद्धी महामार्गाची संकल्पना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्यांनी समृद्धी तयार करण्यासाठी पुढाकार घेतला, हे मान्य आहे.

मात्र, तो काही कुणी एकट्याने केलेला नाही. राज्याने केला आहे, यामुळे समृद्धीचे श्रेय एकट्याचे नाही, आमचे सरकार आले तेव्हा उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी या प्रकल्पाला स्थगिती नाही दिली, असा टोलाही दानवेंनी फडणवीसांना लगावला.

असे आहे विदर्भाचे दुखणे

  • संत्रानगरी अशी ओळख परंतु प्रोसेसिंग प्रकल्प

  • नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या ३८ पैकी ३७ तालुके विदर्भात

  • विदर्भातील सर्वच सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत

  • राज्यातील ३६ हजारपैकी केवळ अडीच हजार उद्योग

  • ५३२ पैकी केवळ ८ आयटी हब विदर्भ-मराठवाड्यात

  • २३ टक्के नोकऱ्यांची गरज असताना विदर्भात केवळ ५ टक्के

  • नोकऱ्या

वेगळ्या विदर्भाच्या भीष्मप्रतिज्ञेचे काय झाले?

विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात सहभागी झाले होते. विदर्भ वेगळा होईपर्यंत लग्न करणार नाही, या फडणवीसांच्या भीष्मप्रतिज्ञेचे काय झाले? सत्तेत आल्यावर वेगळा विदर्भ विसरले का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांनी केला.

विदर्भाचा अनुशेषावर आयोजित कलम २६० अन्वये घेण्यात आलेल्या चर्चेत खडसे बोलत होते. ते म्हणाले, की विदर्भ करार झाल्यानंतर ६२ वर्षांत या कराराचे किती पालन झाले, याचा हिशेब मांडण्याची वेळ आली आहे. विदर्भाच्या विकासासाठी तयार झालेल्या विदर्भ विकास वैधानिक मंडळाची काय स्थिती आहे. विदर्भातील सिंचनप्रकल्प दशकापूर्वी पूर्ण झाले असते तर विदर्भाचे चित्र वेगळे असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT