amravati news  sakal
नागपूर

Amravati News : ‘तू प्रेम करत नसशील, तर बघून घेईल’

विधीसंघर्ष बालकाने दिली मुलीला धमकी

सकाळ वृत्तसेवा

अमरावती - एकतर्फी प्रेमप्रकरणातुन मुलींचा पाठलाग करून त्यांच्याकडे अवास्तव डिमांड करण्याचे प्रकार ग्रामिण भागातही वाढत आहेत. एका विधीसंघर्ष बालकाने अल्पवयीन मुलीस ‘तू प्रेम करत नसशील तर, तुझा भाऊ आणि वडिलांना बघून घेईल’,अशी धमकी दिली. तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

आयुक्तालयाच्या नांदगावपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गावात ही घटना घडली. दहाव्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी सकाळी शाळेत जात असताना, विधीसंषर्घ बालक दहा ते बारा दिवसांपासून तिचा शाळेपर्यंत पाठलाग करीत होता. तीन दिवसांपूर्वी सदर मुलाने मार्गातील एका मंदिराजवळ अल्पवयीन मुलीस थांबविले.

मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्याकडे असलेला मोबाईल हा तुझ्याकडे ठेव, त्या मोबाईलवरुन माझ्याची बोलत जा, चॅटिंग सुद्धा कर, असे सांगून तिचा होकार मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडित अल्पवयीन मुलीने विधीसंघर्ष बालकाजवळचा मोबाईल घेण्यास नकार दिला. त्याचा प्रस्तावही धुडकावून लावला.

तू माझ्यासोबत प्रेम करत नसशील, मोबाईल घेत नसशील तर, वडिलांना आणि भाऊ यांना मारणार व तुलाही पाहून घेईल. अशी धमकी सुद्धा त्याने दिली.

दररोज शाळेत जाताना अल्पवयीन मुलगा आपला पाठलाग करून धमक्या देतो.

याची तक्रार पीडित विद्यार्थिनीने आधी पालकांकडे केल्यावर नांदगावपेठ ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी विधीसंषर्घ बालकाविरुद्ध विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT