pregnancy 
नागपूर

...आणि धावत्या रेल्वेतच तिला येऊ लागल्या प्रसूतिकळा! मग काय झाले, वाचा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता रविवारी "जनता कर्फ्यू' पाळण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या. केवळ पहाटे 4 पूर्वी निघालेल्या रेल्वेगाड्याच आज धावल्या. त्यातीलच नागपूरमार्गे धावणाऱ्या एका रेल्वेतून प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेला अचानक प्रसूतिकळा सुरू झाल्या. सोबत असलेल्या पतीने तिला नागपुरात उतरवून घेतले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला मेयो रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, खडगपूर येथील रहिवासी रिजौल सरफुद्दीन खान कामानिमित्त मुंबईत राहतात. त्यांच्या पत्नीला डॉक्‍टरांनी प्रसूतीची तारीख 28 मार्च दिली होती. प्रसूती गावाकडे व्हावी, म्हणून ते पत्नीला घेऊन जात होते. रेल्वेचे थेट तिकीट उपलब्ध नसल्याने त्यांनी सोलापूर ते खडगपूरचे 02055 सोलापूर-वाराणसी हॉलीडे स्पेशल ट्रेनचे एसी कोच ए-2चे तिकीट मिळविले. दोघेही पनवेल येथून खडकपूरला जाण्यासाठी या रेल्वेतून निघाले. नागपूर येण्यापूर्वीच पत्नीला प्रसवकळा सुरू झाल्या. त्यांनी कसेबसे पत्नीला सावरले. पण, गाडीत फारशा महिला नव्हत्या. शिवाय, नागपूरनंतर बराच वेळ मोठे स्थानक नसल्याचे त्यांना माहीत होते. यामुळे त्यांनी पत्नीसोबत नागपुरातच उतरण्याचा निर्णय घेतला. दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही गाडी नागपूर स्थानकावर पोहोचताच त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांकडे मदतीची याचना केली.

कर्मचाऱ्यांच्या मदतीने पत्नीला खाली उतरवून घेतले. त्यानंतर रेल्वेच्या रुग्णवाहिकेतून महिलेला मेयो रुग्णालयात पोहोचविण्यात आले. वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्याने संभाव्य धोके टळले. सहकार्यासाठी रिजौल यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT