Anil Deshmukh advises activists about ZP elections 
नागपूर

उगाच राजकीय वक्तव्य करून वाद ओढवून घेऊ नका; निवडणुकीची घाई करू नका

राजेश चरपे

नागपूर : जिल्हा परिषदेचे सदस्यत्व रद्द झालेल्या ओबीसी सदस्यांमार्फत सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. निकालाला उशीर असल्याने अस्वस्थ होऊ नका. उगाच राजकीय वक्तव्य करून वाद ओढवून घेऊ नका, असा सल्ला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वांना दिला. 

अनिल देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात पदाधिकारी व सदस्यांसोबत बैठक घेतली. ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागेवर लढलेल्या एकूण १२ सदस्यांचे सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. राज्य निवडणूक आयोगानेसुद्धा तसा आदेश काढला आहे. लवकरच निवडणूक जाहीर होईल, असा कयास लावला जात आहे. याविरोधात काँग्रेसच्या सदस्यांनी न्यायालयात स्थगितीसाठी धाव घेतली आहे. राज्य शासनानेसुद्धा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, निवडणूक होईल असे गृहीत धरून राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजकीय वातावरण तापवणे सुरू केले आहे. आता काँग्रेससोबत नव्हे, तर स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी केली होती. एकत्रित निवडणूक लढल्यानंतर सत्तास्थापनेच्या वेळी काँग्रेसने आघाडीधर्म पाळला नाही. दुय्यम वागणूक दिली. सत्तेत योग्य वाटाही दिला नाही. त्यामुळे १२ जागांवर निवडणूक लढवून काँग्रेसला धडा शिकवावा आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून द्यावी, असे राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात झालेल्या बैठकीत फारशी चर्चा झाली नाही. अनिल देशमुख यांनी अद्याप निवडणूक जाहीर झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणे बाकी असल्याचे सांगितले. कोरोनाचा उद्रेक असल्याने लगेच निवडणूक होण्याची शक्यतासुद्धा नाही. त्यामुळे घाई करण्यात अर्थ नाही, असे सांगून अनिल देशमुख यांनी सर्वांना सबुरीचा सल्ला दिला. 

आतातरी शहाणे व्हा 
निवडणुकीनंतर काँग्रेस कशी वागली सर्वांनाच ठाऊक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याचाही काँग्रेसने मान राखला नाही. यापासून शहाणे होण्याची हीच योग्य वेळ आहे. राजकारणात ताकद दाखवल्याशिवाय कोणी दखल घेत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादीने स्वबळावर लढवावी. 
- प्रवीण कुंटे पाटील,
प्रदेश प्रवक्ता, राष्ट्रवादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT