Anil Deshmukh sakal
नागपूर

Anil Deshmukh: तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या ;अनिल देशमुख, पावसाळी अधिवेशनात घोषणा करावी

तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कर्जमाफी केली पाहिजे. पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केली. महायुती सरकारचे तीन महिने आता शिल्लक राहिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कर्जमाफी केली पाहिजे. पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केली. महायुती सरकारचे तीन महिने आता शिल्लक राहिले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमचे सरकार येणार असल्याचे भाकितही त्यांनी केले.

राज्यात अनेक अधिकारी सरकारच्या दबावात नियमबाह्य काम करीत आहेत. सध्याच्या सरकार तीन महिन्याचे आहे. त्यानंतर आमचे सरकार येणार आहे. त्यामुळे दबावात नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या याद्या आम्ही तयार करीत आहोत. सर्वच जिल्ह्यांत अशा याद्या तयार केल्या जात आहेत. विधानसभेनंतर आमचे सरकार आल्यावर आम्ही त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करू असा इशाराही अनिल देशमुख यांनी दिला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचे आंदोलन सुरू असताना आरक्षणाचे आश्वासन दिले होते. २०१४ नंतर मुख्यमंत्री होते मात्र आजवर ते आश्वासन पूर्ण झालेले नाही आणि याची जाणीव धनगर समाजाला असल्याचे देशमुख म्हणाले. पुण्यात वारंवार ड्रग्स प्रकरणे घडत आहेत. ललित पाटील प्रकरण ताजे असताना हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ड्रग विकले जात असल्याचे व्हिडीओ समोर आले आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे.

एक-दोन अधिकाऱ्यांना निलंबित करून चालणार नाही. जे अधिकारी यात दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. पुणे सांस्कृतिक नगरी पुण्यात अशा घटना वारंवार होणे योग्य नाही. शासनाने याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हिट अँड रनच्या घटना सतत घडत आहेत. नागपूरच्या राम झुलावरील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रितिका मालू १३० दिवसांपासून फरार आहे. तिला राजकीय संरक्षण असल्याची चर्चा आहे. वाहतूक पोलिस संख्या वाढवली पाहिजे. पोलिस निरीक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे भरती प्रक्रिया गतिमान केली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार दिल्ली दरबारी जाऊन हजेरी लावावी लागते. वारंवार परवानगी घ्यावी लागत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT