chandrakant patil sakal
नागपूर

अनिल परब यांनी चौकशीसाठी जायला हवे होते

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली होती. नोटीसनुसार त्यांना मंगळवारी (ता. ३१) ईडीच्या कार्यालयात हजर राहायचे होते. मात्र, अनिल परब उपस्थित झाले नाही. त्यांनी ईडीला पत्र पाठवून पंधरा दिवसांचा वेळ मागितला. यावर भाष्य करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांनी चौकशीसाठी जायला हवे होते, असे म्हटले.

नागपुरात आढावा बैठकीसाठी आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. अनिल परब यांना ईडीने मनी लॉन्डरिंगप्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावला होता. अनिल देशमुख यांचा तपास सुरू असताना या प्रकरणात अनिल परब यांचाही सगभाग असल्याचा संशय ईडीला आहे. मुंबई महापालिकेतील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये खंडणी गोळा करण्याची सूचना अनिल परब यांनी दिली, असे वाझे याने न्यायालयाला सांगितले होते. त्यामुळे समन्स बजावण्यात आला आहे.

मंत्रिपदाची जबाबदारी असल्याने काही ठरलेली कामे आहेत. त्यामुळे चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, असे अनिल परब यांनी ईडी कार्यालयात कळवले आहे. सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते. ही नियम मंत्र्यांनाही लागू होतो. अनिल परब यांनी बिझी असतानाही चौकशीला जायला हवे होते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

आधी संजय राठोड गेले, मग गृहमंत्री अनिल देशमुख गेले. आता अनिल परब यांचा नंबर आहे. महाविकासआघाडीमधील मंत्र्यांची आणखी मोठी लिस्ट आहे. रांगेने एक एक मंत्री आहे. काही जणं सुपात आहे काही जात्यात आहे. कारवाई करण्याचे काम एजंसीचे काम आहे, ते एक एक प्रकरण काढतील. महाविकासआघाडीमधील एक एक मंत्र्यावर कारवाई होत असल्याने शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे, असही चंद्रकांत पाटील म्हणाले.

जनजीवन सुरळीत करा

सरकार प्रत्येक वेळेस तिसऱ्या लाटेची भीती नागरिकांना दाखवत आहे. यामुळेच मंदिर, शाळा, कॉलेज सुरू केलेले नाही. आताही अनेक निर्बंध कायम आहेत. याचा सर्वाधिक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. सरकारने योग्य काळजी घेऊन जनजीवन सुरळीत करायला हवे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

संजय राठोड प्रकरणाचा निकाल लागायला हवा

सुरुवातीला संजय राठोड यांच्यावर पूजा चौहाण आत्महत्या प्रकरणावरून कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ती केस अजूनही चालतच आहे. आता ती संपायला हवी. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, यात त्यांना क्लीनचीट मिळाली. अनिल देशमुख यांच्या क्लीनचिट बाबतही असेच झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: 500 च्या जळलेल्या नोटा कुणाच्या होत्या? Justice Yashwant Varma Cash कांडाची पूर्ण Timeline

Mumbai High Court Order : जयगड बंदरातील आमिराती गॅसवाहू जहाजाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; साडेनऊ कोटी भरा, नाहीतर गॅस रिकामा करा!

Pune Tunnel: पुण्यात आणखी एक बोगदा! सुतारदरा ते पाषाण भुयारी मार्गासाठी लवकरच सल्लागार नियुक्त, महापालिकेचा मोठा प्लॅन

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे कर्वेनगर भागात पडलेल्या प्रचंड खड्डे दुरुस्ती साठी मनसे तर्फे वारजे क्षेत्रीय प्रमुखांना तुकाराम मुंडे यांची प्रतिमा भेट

Gokul Election Update : 'गोकुळ'ची बहुचर्चित प्रारूप मतदार यादी जाहीर; 4,897 संस्थांना मतदानाचा हक्क, 'इतक्या' संस्थांना बसला फटका!

SCROLL FOR NEXT