'Ankur Project' for juvenile  
नागपूर

कोरोना काळात विधीसंघर्षग्रस्त बालकांसाठी ‘अंकुर प्रोजेक्ट’, वाचा सविस्तर

योगेश बरवड

नागपूर : विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने बाल न्याय मंडळातर्फे शासकीय मुलांच्या निरीक्षणगृहात ‘अंकुर प्रोजेक्ट' राबविला जात आहे. ‘पेराल ते उगवेल’ म्हणीचा खरा अर्थ मुलांना उमजावा, मुलांमध्ये स्वयंशिस्त लागावी, समाजहिताचे विचार रुजावेत हे या प्रकल्पाचे ध्यये आहे. 

बाल न्याय मंडळ विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या मनात नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून २१ जुलैपासून अंकुर प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात बालकांना विविध भाज्यांची व झाडांची लागवड व उगवण करण्यात प्रोत्साहित करण्यात येत आहे. तसेच मशरूम लागवड व मशागत देखील निरीक्षण गृहातील एका खोलीमध्ये येथील मुले उत्तमरित्या करीत आहेत. या उपक्रमात मुलांनी वाफे तयार करून त्यामध्ये पालक, मेथी, टमाटर, मिरची, अद्रक या सारख्या भाज्यांची लागवड केली आहे. 

विधीसंघर्षग्रस्त बालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वारंवार तेच विचार मनात घोळका करू नये म्हणून त्यांना कोणत्यातरी कामात गुंतविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांच्यात स्वयंशिस्त व काळजी या दोन गोष्टींची बिजे रूजावित यासाठी त्यांना दैनंदिन जीवनात लागणारा भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात असून त्यात मुलांनी दाखविलेली आवड प्रशंसनीय आहे. रोपट्यांची व झाडांची देखरेख त्यांच्यातील जबाबदारीची जाणीव करून देणारी ठरली आहे. 

हा प्रकल्प बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी शर्वरी महेश जोशी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या या उपक्रमातील विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग उत्तम असून या मुलांच्या मनात उत्तम विचारचे बीज रोवले जावे व त्यांच्या पुनर्वसनास योग्य दिशा मिळावी हा बाल न्याय मंडळाचा उद्देश आहे. अंकुर प्रकल्पासाठी निरीक्षण गृहाच्या अधीक्षका नम्रता चौधरी मुलांना प्रोत्साहन देत आहेत. यापूर्वी एका प्रकरणात बाल न्याय मंडळाने सेवाकार्य तसेच बागकाम करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय यापूर्वीही बाल न्याय मंडळाने विधीसंघर्षग्रस्त बालकांसाठी घेतलेले निर्णय मार्गदर्शक ठरले होते हे विशेष. 

मुलांचे समुपदेशन 
कोविड-19 च्या काळातही बाल न्याय मंडळाचे काम अविरत सुरू असून दररोज प्रकरणांचा निपटारा केला जात आहे. विविध प्रकरणात न्यायदंडाधिकारी शर्वरी जोशी व दामोदर जोगी समुपदेशनाद्वारे मुलांना शिक्षण, पुनर्वसन व त्यांच्या भावी आयुष्याबाबत समजावून सांगत आहेत. त्याद्वारे विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या मनात समाजाप्रती कर्तव्याची जाणीव व्हावी हा हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोव्यात २ रशियन महिला अन् एका आसामच्या महिलेची हत्या, हात-पाय बांधून अत्याचारानंतर हत्येचा संशय; मृतदेह नग्नावस्थेत

Himalayan Glaciers : हिमालयातील हिमनद्यांचे वितळणे; मानवी अस्तित्वासाठी गंभीर इशारा

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्यात ‘माण-विद्यापीठ चौक’ मेट्रो चाचणी यशस्वी; एकोणीस किलोमीटरचे काम पूर्ण, मार्चअखेरपर्यंत मार्ग होणार खुला..

Latest Marathi Live Update: मतदारांना धमकी दिल्याचा आरोप प्रकरणात सिल्लोड न्यायालयाची अब्दुल सत्तारांना नोटीस

India sports complex cleanliness issues : भारताच्या क्रीडा संकुलातील स्वच्छतेच्या समस्येवर आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा रोष

SCROLL FOR NEXT