Announcement of reservation for the post of Gram Panchayat Sarpanch 
नागपूर

कामठी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींवर येणार ‘महिलाराज’; ४७ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

सतीश दहाट

कामठी (जि. नागपूर) : तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींपैकी २४ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत. पुरुष सरपंचांची संख्या २३ असेल. पुरुषांपेक्षा महिला सरपंचांची संख्या एकने जास्त आहे.

आगामी काळात होऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणुका लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानुसार कामठी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (ता. १०) तालुक्यातील ४७ सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. हे आरक्षण सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी आहे.

सन १९९५ ते २०१५ या कालावधीचा आरक्षण व लोकसंख्येवर आरक्षण आढावा घेऊन तालुक्यातील ४७ ग्राम पंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. तहसीलदार गणेश जगदाळे यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत काढण्यात आली. तालुक्यातील नेरी येथील सुरज वंजारी या १३ वर्षीय मुलांच्या हस्ते आरक्षित पदाची ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली.

तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद हे आरक्षित झाले आहे. यामध्ये अनुसूचित जाती ८, अनुसूचित जमाती ३, मागास प्रवर्गातील १३ सरपंचांचा समावेश आहे. एकूण २४ महिला सरपंचामध्ये अनुसूचित जाती ४, अनुसूचित जमाती २, मागास प्रवर्गातील ७ व सर्वसाधारण प्रवर्गातील ११ महिला सरपंचांचा समावेश आहे.

असे आहे तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण 

अनुसूचित जाती महिला नान्हा, सुरादेवी, नेरी, लिहिगाव
अनुसूचित जमाती  उमरी 
अनुसूचित जमाती महिला वारेगाव, खेडी
नागरिकांचा मागास प्रवर्ग कवठा, आजनी, बिना, रणाळा, टेमसना, परसाड
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जाखेगाव, गुमथळा, खापा, चिखली, वरंभा, भामेवाडा, घोरपड
सर्वसाधारण लोणखैरी, कोराडी, भिलगाव, भोवरी, कढोली, तरोडी (बु), दिघोरी, गारला, वडोदा, आडका, पावनगाव, चिकना
सर्वसाधारण महिला सोनेगाव, गुमथी, खसाळा, खैरी, शिवणी, केसोरी, कापसी (बु), केम, गादा, बिडगाव, बाबूलखेडा
अनुसूचित जाती महालगाव, भूगाव, येरखेडा, आवंढी

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: पावसाने राज्याची चिंता वाढवली; पण पुढील वर्षासाठी गुड न्यूज! एल निनोबाबत ‘नोआ’नेमका काय वर्तवला अंदाज?

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

SCROLL FOR NEXT