anti-rabies vaccine is not avilable in nagpur corporation hospital 
नागपूर

कुत्रा चावल्यानंतर आले `हे` सत्य उघडकीस...वाचा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : "कुत्र्यांची नसबंदी'ची मोहीम थंडावल्यामुळे मोकाट कुत्र्यांचा हैदास वाढला आहे. मेयो-मेडिकलमध्ये दरदिवसाला कुत्रा चावल्याचे दहा ते पंधरा रुग्ण येतात. कुत्रा चावल्यानंतर शहरात महापालिकेच्या सहा दवाखान्यांमध्ये मोफत प्रतिबंधक लस टोचण्याच्या उपक्रमाला थांबा लागला आहे.

मंगळवारी कुत्रा चावल्यानंतर हा विद्यार्थी महालमधील महापालिकेच्या दवाखान्यात अँटीरेबीज लस टोचून घेण्यासाठी गेला. लस नसल्याचे सांगत त्याला परत पाठवले. ही बाब उघडकीस आल्यानंतर पालिकेत विचारणा केल्यानंतर सत्य उघडकीस आले.

पालिकेत अँटीरेबिज लसीचा तुटवडा आहे. एकही लस नसल्याची माहिती पुढे आली. ऋषभ आवळे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. लकडगंज परिसरात तो राहातो. मंगळवारी काही कामानिमित्त लकडगंज पोलिस ठाण्याच्या समोरून जात होता. येथे काही मोकाट कुत्रे त्याच्यामागे धावले. एका कुत्र्याने चावा घेतला.

घाबरलेला ऋषभ महापालिकेच्या महाल येथील प्रभाकर दटके रुग्णालयात अँटीरॅबीज लस टोचून घेण्यासाठी गेला. लस नसल्याचे त्याला सांगण्यात आल्याने त्याने डॉक्‍टरांसह पालिकेच्या वरिष्ठ डॉक्‍टरांशी संपर्क केला असता, त्याला दोन ते तीन महिन्यांपासून लस नसल्याचे सांगण्यात आले. शेवटी या मुलाने बुधवारी स्वतंत्र लस खरेदी करून तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून टोचण्याचे निश्‍चित केले.

या विषयावर पालिकेच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर लस नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सोबत या लस खरेदीबाबतची फाइल वित्त विभागाकडे असून, लवकरच लसी उपलब्ध होणार असल्याचा दावा केला. 

महापालिकेत असलेला "अँटीरेबीज इम्युनोग्लोबुलिन' लसीचा साठा संपला आहे. एका विद्यार्थ्याला याचा फटका बसला. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर पालिकेच्या दवाखान्यात लस मिळेल यासाठी भटकंती केली. अखेर धनुर्वाताची लस टोचून घरी आला. 

कोरोनामुळे गरीब आर्थिक अडचणीत आहेत. श्वानदंशाचे इंजेक्‍शन महाग आहे. गरिबांनी कसे खरेदी करायचे? महापालिकेच्या आरोग्य विभागाने लस उपलब्ध करून द्यावी. 
-सुबोध चहांदे, सामाजिक कार्यकर्ता. नागपूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

Pune Crime : जामखेडनंतर सासवडमध्येही खून; पुणे ग्रामीण पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा केला पर्दाफाश!

SCROLL FOR NEXT