apali bus handover to maha metro in nagpur  
नागपूर

आपली बसचे स्टेअरिंग महामेट्रोकडे, ४७८ बस देणार मेट्रोला

राजेश प्रायकर

नागपूर : शहर बस महामेट्रोकडे देण्याच्या प्रस्तावावर महापालिका सभागृहानेही आज शिक्कामोर्तब केले. सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. 

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहर वाहतूक व्यवस्था एकाच प्राधिकरणाकडे असावी, असे मत व्यक्त केले होते. एवढेच नव्हे त्यांनी शहर बसही महामेट्रोनेच चालवावी, असा सल्लाही दिला होता. त्याअनुषंगाने आज या प्रस्तावाला महापालिकेच्या सभागृहानेही मंजुरी दिली. मेट्रोला आपली बस हस्तांतरणाला मंजुरी देतानाच परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचारीही मेट्रोत जातील की नाही? याबाबत संभ्रम आहे. मनपाच्या शहर बस सेवेमध्ये २३७ स्टँडर्ड डिझेल बस, ६ महिलांसाठी विशेष 'तेजस्विनी' बस, १५० मिडी व ४५ मिनी बस अशा एकूण ४३८ बस आहेत. याशिवाय ४० इलेक्ट्रिक बस येणार आहेत. अशा एकूण ४७८ बस महामेट्रोला देण्यात येणार आहे. 

साई क्रीडासंकुलाचा मार्ग मोकळा - 
तरोडी खुर्द येथे ८७ एकरावर होत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या 'साई'च्या मार्ग मोकळा झाला आहे. या जागेवरील अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज दिले. भाजपचे नगरसेवक बंटी कुकडे यांनी साई क्रीडासंकुलाचा विषय आज मनपाच्या सर्वसाधारण सभेत उचलून धरला. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT