The appointments in the energy department were temporary 
नागपूर

ऊर्जा विभागातील नियुक्‍त्यांवरून आघाडीत बिघाडी?, जाणून घ्या काय झाला प्रकार... 

योगेश बरवड

नागपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी व महापारेषण कंपनीच्या संचालक मंडळावर करण्यात आलेल्या आठ अशासकीय सदस्यांच्या नियुक्‍तीवरून सत्ताधारी आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेने या एकतर्फी निर्णयावर आक्षेप नोंदविल्यानंतर सर्व नियुक्‍त्या रद्द करण्यात आल्या. परिणामी पदभार स्वीकारण्यापूर्वीच पायउतार होण्याची वेळ नवनियुक्त सदस्यांवर आली आहे. 

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी 20 जुलै रोजी या अशासकीय सदस्यांच्या नियुक्‍त्या केल्या. कॉंग्रेसजनांना त्यात स्थान देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीवर नागपूरचे नितीन कुंभलकर, सचिन मुकेवार, बीडचे रवींद्र दळवी, बीड जिल्ह्यातील केजचे अशोक पाटील यांची तर महापारेषण वर यवतमाळचे माजी आमदार कीर्ती गांधी, जामनेरच्या ज्योत्सना विसपुते, महावितरणचे माजी कार्यकारी संचालक उत्तम झाल्टे, कोल्हापूरचे बॉबी भोसले यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

परस्पर करण्यात आलेल्या नियुक्‍त्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. नियुक्‍त्यांपूर्वी आम्हाला विश्‍वासात घेण्यात आले नसल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला होता. कॉंग्रेसचे नेतेसुद्धा या परस्पर घेण्यात आलेल्या निर्णयामुळे नाराज होते. त्यातील काहींनी थेट पक्षश्रेष्ठींकडे या प्रकाराची तक्रार केली होती. 

महत्त्वाच्या नियुक्‍त्या करताना प्रथम चर्चा नंतर नियुक्ती असे धोरण महाआघाडीने मान्य केले आहे. यानंतरही या नियुक्‍त्या करताना घटकपक्षांसोबत चर्चा का करण्यात आली नाही, असा सवालही राष्ट्रवादी, शिवसेनेने उपस्थित करीत नियुक्‍त्या रद्द करण्याची मागणी केली होती. कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नियुक्‍त्यांवर फेरवीचार करण्याचे सुतोवाच केले. यानंतर सर्व अशासकीय सदस्यांच्या नियुक्‍त्या सरकारकडून रद्द करण्यात आल्या. 

नियुक्ती करताना कॉंग्रेसच्या नेत्यांचा सल्लाही घेण्यात आला नव्हता. शिवाय सदस्यांच्या नियुक्तीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनीही मंजुरी दिली नव्हती. वैद्यकीय कारणावरून असीम गुप्ता सुटीवर होते. प्रभार सांभाळणारे दिनेश वाघमारे यांच्याकरवी डॉ. राऊत यांनी सदस्यांच्या नियुक्तीला मंजुरी मिळवून घेतल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vande Bharat News: पुणे रेल्वे स्थानकावर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात कसा झाला? कारण आलं समोर, चौकशीचे आदेश

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Pune Charity Commissioner : पारदर्शक न्यायदान हाच न्यायव्यवस्थेचा कणा : पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचा कार्यभार स्वीकारताना निर्धार

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Mohol Crime : पैशाच्या वादातून एकाचा खून, एक गंभीर जखमी; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT