दयाशंकर तिवारी  
नागपूर

सूतिकागृहात ७० ऑक्सिजनयुक्त बेड्सची सुविधा; ऑक्सिजन प्रकल्पही उभारण्याचं महापौरांचं आश्वासन

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : महापालिकेच्या पाचपावली सूतिकागृह रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या ७० बेडची सुविधा उद्या सोमवारपासून सुरू होईल, असे आज महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. येथेच सहा किलोलिटरचा ऑक्सिजन प्रकल्प महापालिका उभारणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महानगरपालिकेच्या माध्यमातून पाचपावली सूतिकागृह येथे कोव्हिड रुग्णांसाठी ११० खाटांची व्यवस्था केली आहे. महापौरांनी आज या रुग्णालयाची पाहणी केली. ऑक्सिजनची व्यवस्था असलेले ७० बेड्सचे रुग्णालय सोमवारपासून नागरिकांच्या सेवेत सुरू होईल. या रुग्णालयातील लसीकरण केंद्र स्थानांतरित करून बेड्सची संख्या ११० बेड्सपर्यंत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सध्या येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला बाळाभाऊपेठ येथील मनपा शाळेच्या इमारतीत हलविण्यात येइल.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात मनपाची चमू या कामात लागली असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या नागपूरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असून, या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहे. लिक्विड ऑक्सिजनला गॅसमध्ये परिवर्तन करून रुग्णांना दिला जाईल. या रुग्णालयाची व्यवस्था स्वयंसेवी संस्था अशरफी फाउंडेशन यांना दिली आहे. डॉक्टर्स, फिजिशियनसुद्धा येथे राहतील. यावेळी महापौरांसोबत उपायुक्त मिलिंद मेश्राम, झोनल आरोग्य अधिकारी डॉ. दीपांकार भिवगडे आणि रुग्णालयातील डॉक्टर्स उपस्थित होते.

ऑक्सिजन प्रकल्प असलेले पहिले रुग्णालय

या रुग्णालयात भरती रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी मनपा सहा किलोलिटरचा ऑक्सिजन प्लांट उभारणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था असणारे हे नागपुरातील पहिले शासकीय रुग्णालय आहे, असे महापौरांनी आवर्जून सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT