file 
नागपूर

बाहेरून येताच थेट पोहोचले घरी अन्‌ मग ग्रामस्थांनी एकच केले, काय ते वाचाच....

दिलीप चव्हाण

कुही (जि.नागपूर)  :  तेलंगणा राज्यातून तसेच नागपूर जिल्ह्यातून चिकना येथे येताच काही कामगारांनी सुरक्षेच्या दृष्टीने कोणाचीही परवानगी न घेताच थेट घरी प्रवेश केला. गावाच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या दक्ष सुरक्षा कमिटीने चारही कुटुंबाना 14 दिवसांसाठी होमक्वारंटाइन ठेवण्याचा निर्णय घेतला.यावरून ग्रामस्थांनी स्वतःच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसून येते.

गावाच्या सुरक्षेला प्राधान्य
चिकना या गावामध्ये कोरोना व्हायरसशी लढा देत असताना शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून 22 मार्च रोजी एक दिवसाचा जनता कर्फ्यू ग्रामस्थांनी योग्यरित्या पार पाडला. 25 मार्च रोजी लॉकडाऊन 21 दिवसांचे चालू केले असताना चिकना येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य मिळून गावात लॉकडाउन केले. प्रथम गावातील मुख्य रस्त्यावर चेक पोस्ट लावली, तसेच ग्रामपंचायतमार्फत सॅनिटायझर व मास्क देऊन गावकऱ्यांना कोरोनापासून संरक्षणाचा मंत्र दिला. धुरळणी व हायपोक्‍लोराईड सोडियमची फवारणी करून गावाचे निर्जंतुकीकरण केले. गावामध्ये बाहेर गावावरून कोणीही व्यक्‍ती आली किंवा कामानिमित्त येणाऱ्या जाणाऱ्यास परवानगी देण्यात आली असतानाच नागपूर, नाशिक, पुणे या शहरातील लोकांना मात्र गावामध्ये येताच त्यांच्या कुटुंबासह होमक्वारंटाइन करण्यात आले.


सुरक्षाकार्यात कमिटीचा पुढाकार
नागपूर व तेलंगणावरून आलेल्या चारही कुटुंबांना ग्रामसुरक्षा कमिटीने होमक्वारंटाइन केले. कमिटीकडे समितीच्या लोकांची देखरेख आहे. बाहेरून गावात येताच कोणालाही न विचारता ते घरी गेल्याने त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबीयासह त्यांना होमक्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरपंच बापूराव मोटघरे, पोलिस पाटील सूर्यकांता निकोसे, तलाठी राकेश तभाने, आरोग्य विभागाचे ललेंद्र थूल, उपसरपंच तुळशीदास कळंभे, ग्रा. पं. सदस्य नागोराव मांढरे, आशावर्कर मीना शिवरकर, अंगणवाडीसेविका निरूपाला मोटघरे, ग्रामपंचायतचे कर्मचारी प्रवीण कळंभे, जलसुरक्षक धर्मेंद्र मोटघरे, मदतनीस रमा वासनिक, ग्रामसेवक अनिल लिंगायत, स्वयंसेवक जिगर शिवरकर, सामाजिक कार्यकर्ते लोकनाथ निकोसे, कोतवाल मिलिंद मोटघरे, कृषी सहायक गणेश तिबुडे या कमिटीने गावाच्या सर्व सुरक्षाकार्यात पुढाकार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT