Artists are creating awareness about corona by shortfilm 
नागपूर

"चल गं आजीबाई टुणुक टुणुक" या शॉर्टफिल्ममधून करताहेत कोरोनाविषयक जनजागरण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अनेक लोक अजूनही लॉकडाऊनचे नियम पूर्णपणे पाळत नाहीत. अशांच्या जनजागृतीसाठी काही स्थानिक कलाकारांनी एका शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. "चल गं आजीबाई टुणुक टुणुक" असे तिचे नाव असून, शॉर्टफिल्मच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. 

"चल गं आजीबाई टुणुक टुणुक" ही नऊ मिनिटांची शॉर्टफिल्म नागपूर कट्टाने निर्मिलेली  आहे. संहितेचे लेखन ज्येष्ठ अभिनेते देवेंद्र दोडके यांनी तर दिग्दर्शन विनोदी अभिनेते राजेश चिटणीस यांनी केले आहे. या शॉर्टफिल्ममध्ये आसावरी गडेकर, डॉ. नरेश गडेकर, संजय भाकरे, देवेंद्र लुटे, विनोद काळे, विरेंद्र लाटकर व विनोद देशपांडे यांच्या भूमिका असून, संगीत अभिषेक बेल्लारवार यांचे आहे. तर आजीबाईच्या मुख्य भूमिकेत राजेश चिटणीस  आहेत. 
"चल रे भोपळ्या टुणुक टुणुक" या जगप्रसिद्ध मराठी कथेची आठवण ही शॉर्ट फिल्म पाहतांना प्रत्येकाला येईल. जंगलाच्या मार्गाने मुलीला भेटायला गेलेली आजीबाई, वाटेत तिचा वाघासोबत झालेला संवाद यात दाखविण्यात आला आहे. पुढे आजीची तब्येत खराब होते, तिला कोरोनाचा संसर्ग होतो अन् अपेक्षित अनुभव येत जातात. मुलीला भेटण्याचा मोह सोडून घरीच सुरक्षित राहिली असती तर कोरोना झाला नसता असे आजीला वाटू लागते, याचा बोध घेऊन प्रत्येकाने सुरक्षित राहावे. शासनाचे नियम तोडून बाहेर फिरणाऱ्यांना संसर्ग झाला तर मनुष्याप्रमाणे प्राणीही त्यास नाकारतील असा संदेश त्यातून देण्यात आला आहे.
जंगलाच्या मार्गाने परत येणाऱ्या आजीबाईला शिकार करण्यासाठी वाघाने अडविले. मात्र आजीबाईला कोरोना झाल्याचे समजल्यानंतर त्यानेही जंगल बंदीची मागणी केली. अर्थात लॉकडाउनचे नियम तोडून एखाद्याला कोरोना झाल्यास सामान्य माणसाप्रमाणे जंगली प्राणी देखील त्याला नाकारू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने घरात रहा सुरक्षित रहा असाच सामाजिक संदेश यातून देण्याचा देण्याचा प्रयत्न नागपूर कट्टा या व्यासपीठाने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT