Arun Gawli's application was rejected 
नागपूर

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला नाकारला पॅरोल; तळोजा कारागृहात शरण येण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पॅरोल रजेमध्ये मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. रविवारी त्याची रजा संपत आहे. त्याला मुंबईच्या तळोजा कारागृहात शरण येण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. 

लॉकडाउन असल्यामुळे हजर राहणे शक्‍य नसल्याने पॅरोल रजा वाढवून मिळावी म्हणून उच्च न्यायालयात त्याने तिसऱ्यांदा याचिका दाखल केली होती. त्यावर, शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली. पत्नी आजारी असल्याने 13 मार्च रोजी अरुण गवळी याला 45 दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर 28 एप्रिल रोजी त्याला 10 मेपर्यंत पुन्हा पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. मात्र, लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने 8 मे रोजी रजा वाढवून मिळावी या विनंतीसह त्याने न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला होता. 

त्यानुसार 24 मे पर्यंत पॅरोल रजा वाढवून देण्यात आली होती. ही रजा संपत आल्याने गवळी याने गुरुवारी (ता. 21) तिसऱ्यांदा पॅरोलसाठी अर्ज केला होता. मात्र, त्याचा हा विनंती अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला असून, त्याला मुंबई येथील तळोजा कारागृह प्रशासनाकडे शरण येण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. 

गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला 20 मे 2008 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानुसार तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. गवळीतर्फे ऍड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

Latest Marathi News Live Update : सीबीआय संचालक निवडीसाठीच्या बैठकीनंतर राहुल गांधी पंतप्रधान निवासस्थानातून रवाना

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

Karnataka Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 1.50 टक्क्यांची वाढ; 'या' तारखेपासून लागू होणार नवे वेतन

SCROLL FOR NEXT