Illegal Abortion Case wardha sakal
नागपूर

आर्वी अवैध गर्भपात प्रकरण : जामीन अर्जावर तारीख पे तारीख

डॉ. रेखा कदम व डॉ. नीरज कदम यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज जामीन अर्जावर विशेष जिल्हा सत्र न्यायालय बुधवारी निर्णय देणार

सकाळ वृत्तसेवा

आर्वी : येथील कदम हॉस्पिटलमध्ये चौदा वर्षीय बालिकेचा गर्भपात करण्यात आला. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले डॉ. रेखा कदम व डॉ. नीरज कदम यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर आज शनिवारी (ता. ५) सुनावणी होणार होती. मात्र, या सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने जामीन अर्जावर विशेष जिल्हा सत्र न्यायालय बुधवारी (ता. ९) निर्णय देणार आहे.

गर्भपातप्रकरणी पोलिसांनी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा कदम हिला ९ जानेवारीला अटक केली. तपासात कदम हॉस्पिटलमधील अनेक बेकायदेशीर प्रकार बाहेर आले. गोबर गॅस प्लांटमधून १२ कवट्या व ५४ हाडे मिळाली तर शासकीय रुग्णालयाच्या वापराकरिता असलेल्या औषधांचा साठाही जप्त करण्यात आला. काळविटाच्या कातडीसह तपासात तीन कपाटांतून एक कोटी रुपये जप्त करण्यात आले. डॉ. रेखा कदम यांचे मेडिकल कौन्सिलकडे नोंदणीच नसल्याचे चौकशीत समोर आले. पती डॉ. नीरज कदम यांनी या गर्भपात प्रकरणात मदत केल्याने त्यालाही सहआरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले.

वेगवेगळ्या दिवशी अर्ज

डॉ. रेखा कदम व डॉ. नीरज कदम यांनी वेगवेगळ्या दिवशी जामिनाकरिता अर्ज दाखल केले आहेत. १४ जानेवारीला दाखल केलेला जामीन अर्ज निर्णय घेण्याकरिता १८ जानेवारी, २० जानेवारी, २४ जानेवारी, २७ जानेवारी ३१ जानेवारी व पाच फेब्रुवारीला विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या पटलावर ठेवण्यात आला होता. दुसऱ्याचा २१ जानेवारीला दाखल केलेला अर्ज २४ जानेवारी, २७ जानेवारी, ३१ जानेवारी व पाच फेब्रुवारीला न्यायालयीन पटलावर ठेवण्यात आला होता.

वनविभागाला डॉ. कदम बाहेर येण्याची वाट

कदम यांच्या निवासस्थानामधून मिळालेल्या काळविटाच्या कातडीप्रकरणी वनपरिक्षेत्राधिकारी जाधव यांनी गुन्हा दाखल करून सुमारे २० दिवस लोटले. मात्र, प्रकरण जागेवरच थांबले आहे. वन विभागाची तपासचक्रे फिरण्याअधीच पोलिसांनी डॉ. कदम याला अटक केली. न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान वनविभागाने चौकशीकरिता न्यायालयाकडून डॉ. कदम याचा ताबा मागायला पाहिजे होता. मात्र, त्याकरिता न्यायालयीन प्रक्रियाच त्यांनी केली नाही. तर डॉ. कुमारसिंह कदम हे खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे त्यांच्याकडूनसुद्धा चौकशी करता येत नसल्याने डॉ. कदम याची जामिनावर बाहेर येण्याची वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

Maharashtra Monsoon: मुसळधार पावसानंतर अचानक उघडीप! घाटमाथा-कोकणात पावसाचा जोर ओसरला; IMD ने सांगितले कारण

India vs England ODI : इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, कारण काय?

Pune Heavy Rain: अतिवृष्टीचा फटका! शिनोली-भोजनेवाडी मार्गावर दरड कोसळली; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर चार मिनिटं हवेतच, एकाच ठिकाणी घिरट्या, नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT