Vanrai Dams sakal
नागपूर

Water Storage : वनराई बंधाऱ्‍यांतून तब्बल ३१०१ टीएमसी पाणी अडविले

ग्रामीण भागात गावापासून वाहणाऱ्‍या नदी, नाल्यावर सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळू व दगड यांच्या सहाय्याने पाणी अडविण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - जिल्ह्यातील बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे. शासनाचे अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण स्थितीत आहेत. त्यामुळे छोट्या-छोट्या बंधाऱ्यांच्या माधमातून पाण्याची साठवणूक करून सिंचन व्यवस्था निर्माण करण्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी भर दिला आहे.

ग्रामीण भागात गावापासून वाहणाऱ्‍या नदी, नाल्यावर सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळू व दगड यांच्या सहाय्याने पाणी अडविण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला. जिल्हा परिषदेने २०२३ मध्ये १३ तालुक्यात ८८६ वनराई बंधारे बांधून ३१०१ टीएमसी पाणी अडविले. यातून ४५९ हेक्टर क्षेत्रात सिंचन क्षमता तयार झाली. त्यामुळे शेतकऱ्‍यांना मोठा फायदा होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागामार्फत १३ तालुक्यांमध्ये पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामपंचायत स्तरावर लोकसहभागातून नदी, नाल्यांवर वनराई बंधारा बांधण्याचे नियोजन करण्यात आले. ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ३ हजार वनराई बंधाऱ्‍यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.

त्यापैकी ८८६ बंधाऱ्‍याचे बांधकाम पूर्ण झाले. सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये माती, मुरूम व रेती भरून नदी नाल्यांमध्ये आडवे-उभे रचण्यात आले. पावसाळ्यात पाणी अडविण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे. या बंधाऱ्यांची उंची ०.७० मीटर असून एका वनराई बंधाऱ्‍यातून ३.५० टीएमसी पाणी अडविण्यास मदत होणार आहे.

२०२३ मध्ये संपूर्ण जिल्ह्यात ८८६ बंधारे बांधण्यात आले. यातून ४५९ हेक्टरवर सिंचन होणार असून ३१०१ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा साठविण्यास मदत होणार आहे. याचा फायदा आजूबाजूच्या शेतकऱ्‍यांना होणार असून विहिरीतील पाण्याची पातळी वाढून पाण्याचे पुनर्भरण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT