ashish deshmukh claim allegations against Fadnavis are baseless Sakal
नागपूर

Nagpur : अनिल देशमुखांचा पेनड्राईव्ह ‘करप्ट’; आशिष देशमुख यांचा दावा, फडणवीस यांच्यावरील आरोप बिनबुडाचे

Ashish Deshmukh Over Anil Deshmukh Pendrive Evidence : मुलाने काटोल विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून लढायचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुलाने काटोल विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून लढायचे आहे. याकरिता ते फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप करीत असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते तसेच माजी आमदार डॉ. आशिष देशमुखांनी केला. त्यांच्याकडे असलेला पेनड्राईव्ह ‘करप्ट'' असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

राज्यात सध्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात ‘पेनड्राईव्ह''वरून चांगलीच जुंपली आहे. फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी फडणवीस यांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला होता.

त्यावर फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत तुम्ही काय बोलला याचा पेनड्राईव्ह आपल्याकडे असल्याचे सांगितले होते. दुसऱ्याच दिवशी देशमुखांनी तुमचाही पेनड्राईव्ह आमच्याकडे असल्याचे सांगून त्यांना प्रत्त्युत्तर दिले होते.

या वादात आता अनिल देशमुख यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी उडली घेतली आहे. ते म्हणाले, सलील देशमुख यांनी काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या भेटी घेतल्या आहेत.

त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावर नवीन मतदारसंघ शोधण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वाट्याला देवेंद्र फडणवीस यांचा दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ येणार आहे. हे कळल्यावर अनिल देशमुखांनी फडणवीस यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. या माध्यमातून ते दक्षिण-पश्चिमवरील आपला दावा भक्कम करीत असल्याचे आशिष देशमुख यांनी सांगितले.

निवडणुकीच्या तोंडावर जागे झाले

अनिल देशमुख यांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. मागील दीड वर्ष ते शांत बसले होते. आता निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघ उपलब्ध नसल्यामुळे ते जागे झाले आहे. फडणवीस यांच्याविरोधात लढता यावे म्हणून ते खोटे आरोप करून मीडियाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत. पेनड्राईव्हबद्दल सांगायचे झाल्यास, त्यात नक्कीच काहीच गोपनीय माहिती नाही. त्यांचा पेनड्राईव्ह करप्ट आहे असेही आशिष देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT