Ashish Deshmukh criticized Government over Budget 2021 updates  
नागपूर

Budget 2021: हा अर्थसंकल्प बेरोजगार आणि उद्योगधंद्यांना मारक; डॉ. आशिष देशमुख यांची टीका 

सकाळ डिजिटल टीम

नागपूर ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसाधारण असाच आहे. आर्थिकदृष्ट्य़ा कमजोर असलेल्या वर्गाकडे या अर्थसंकल्पात साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प बेरोजगार आणि उद्योगधंद्यांना मारक असल्याची टिका काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि कॉंग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांनी केली.कोरोनाच्या महामारीनंतर बेरोजगारी, व्यापार, शेतकऱ्यांच्या समस्या, आर्थिक मंदी, उद्योगांमध्ये आर्थिक गुंतवणूक, आरोग्य, महागाई व पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमतीत सतत होणारी वाढ  या देशातील प्रमुख समस्यांना उग्र रूप धारण केले आहे. 

कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद झाले, लाखो लोकांच्या हातचा रोजगार गेला. या समस्यांवर मात करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी काहीच ठोस उपाययोजना अर्थसंकल्पात केल्या नाहीत. हा सर्वसाधारण अर्थसंकल्प असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलतींमध्ये वाढ करणे गरजेचे होते, त्या करण्यात आल्या नाहीत. एकुणच काय तर सर्वसामान्यांच्या अपेक्षांना पाने पुसणारा हा अर्थसंकल्प आहे.

आर्थिकदृष्ट्य़ा कमजोर वर्गाला सरकारने दुर्लक्षित केले आहे. सद्यःस्थितीत देशात मागील ४५ वर्षात सर्वांत जास्त बेरोजगारी गेल्या वर्षी वाढली आहे. त्यामुळे  युवक-युवतींना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे आणि भविष्यातही करावी लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे.

बंद असलेल्या किंवा मृतावस्थेत असलेल्या उद्योगांना पुनर्जिवित करण्यासाठी उपाययोजना,औद्योगिक गुंतवणूक, नवे उद्योग, जीडीपी दरातील उतार या समस्यांवरसुद्धा काहीच तोडगा अर्थसंकल्पात दिसत नाही. त्यामुळे ‘५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चे मोदी सरकारचे स्वप्न भंगले आहे. बेरोजगारी व उद्योगधंद्यांना मारक असा हा अर्थसंकल्प आहे, असे डॉ. देशमुख म्हणाले.

सविस्तर अभ्यासाअंती असे लक्षात आले की, हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे. पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. सर्वसामान्यांना सवलती मिळतील, अशी कुठलीही तरतूद करण्यात आली नाही. सरकारी कंपन्या विकण्याचा घाट सरकारने घातला आहे. या अर्थसंकल्पामुळे गरीब अधिक गरीब होत जाईल आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होतील. एकंदरीत सर्वसामान्यांना निराश करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे डॉ. आशिष देशमुख म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : हातात पिस्तूल घेऊन ‘किंग ऑफ शिरूर’ची रील व्हायरल; दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई कधी?

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT