Congress-BJP e sakal
नागपूर

काँग्रेसच्या नेत्याकडून भाजप उमेदवाराचा प्रचार, काँग्रेसमध्ये खळबळ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख (congress leader ashish deshmukh) पक्षातील नेते आणि पक्षावर सतत काही ना काही आरोप करत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांचा वाद दिल्लीत देखील पोहोचला होता. आता आशिष देशमुखांनी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी (nagpur zp election) चक्क भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचे समोर आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर नागपुरातील ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक घोषित करण्यात आली. उमेदवारांनी अर्ज देखील भरले होते. त्याचवेळी सावरगाव जिल्हा परिषद सर्कलच्या भाजप उमेदवार पार्वताबाई काळबांडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः काँग्रेसचे आशिष देशमुख गेले होते. आता आशिष देशमुखांनी काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्यावर दीडशे कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करत हकालपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली होती. त्यानंतर केदारांनी दिल्ली गाठली होती. तसेच आशिष देशमुख देखील दिल्लीत पोहोचले होते. हायकमांडने त्यांची समजूत काढून माघारी पाठवले होते. त्यानंतर आता आशिष देशमुखांनी भाजप उमेदवारांचा अर्ज भरल्याची बाब उघडकीस आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, आता निवडणूक आयोगाने परत निवडणुका घोषित केल्या आहेत. मात्र, ज्याठिकाणी निवडणुका स्थगिती केल्या होत्या त्याचठिकाणाहून परत सुरुवात केली जात आहे. आशिष देशमुखांनी पार्वताबाई काळबांडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास स्वतः हजेरी लावली होती. आता ते त्यांचा प्रचार देखील करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT