aashish shelar and devendra fadanvis aashish shelar and devendra fadanvis
नागपूर

… म्हणूनच आशिष शेलारांना मिळाली धमकी

यापूर्वी देखील आशिष शेलार यांना धमकी मिळाली होती

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : भाजपचे (BJP) नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना कुटुंबीयांसह ठार मारण्याची धमकी देण्यात आली. आशिष शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून धमकी (threat call) देण्यात येते आहे. आशिष शेलार नेहमी सरकार विरोधात भूमिका मांडतात. सरकारमधला भ्रष्ट्राचार ते काढत असतात, यामुळेच त्यांना धमकी दिली गेली असावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले.

धमकी मिळाल्यानंतर आशिष शेलार यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. दोन्ही मोबाइल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती शेलार यांनी पोलिसांना केली आहे. २०२० मध्ये अशाच प्रकारे धमकी देणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. शेलार यांनी अनोळखी नंबरवरून धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

आशिष शेलार हे भाजपचे प्रमुख नेते आहे. त्यांना यापूर्वी देखील धमकी मिळाली होती. शेलार आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून झालेल्या प्रकाराची माहिती देतील आणि कारवाई करण्याची मागणी करतील, असं समजते. आशिष शेलार नेहमी सरकारविरोधात भूमिका मांडतात. सरकारमधला भ्रष्ट्राचार ते काढत असतात. त्यामुळे त्यांना ही धमकी आली असेल. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सर्वांनी मर्यादा पाळायला हवी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत अपशब्दाचा वापर करण्यात आला. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षांनीच नाही तर महिलांबाबत वक्तव्य करताना सर्वांनीच मर्यादा पाळायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT