तरुणीने सचित व नातेवाइकांसोबत ओमची ओळख करून दिली. दुसऱ्या दिवशी अनोळखी मोबाइल क्रमांकावरून ओमच्या मोबाइलवर फोन आला. Sakal
नागपूर

Nagpur Crime News : मैत्रिणीशी बोलल्याने वर्गमित्रावर हल्ला; तरुणीसह दहा जणांवर गुन्हा दाखल

तरुणीने सचित व नातेवाइकांसोबत ओमची ओळख करून दिली. दुसऱ्या दिवशी अनोळखी मोबाइल क्रमांकावरून ओमच्या मोबाइलवर फोन आला.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur Crime : वर्गमैत्रिणीसोबत बोलल्याने तिच्या साथीदारांनी एका युवकावर हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओम जयदीप इंगळे (वय २३, रा. प्रगती कॉलनी) असे जखमीचे नाव असून सचित धार्मिक, तरुणी आणि आठ जणांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम हा फामर्सी कॉलेजच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याच्यासोबत ही तरुणी शिकते. महिन्याभरापूर्वी रामनवमी शोभायात्रेत तरुणी, तिचे नातेवाइक व सचित हे ओमला लोहापुलाजवळ भेटले.

यावेळी तरुणीने सचित व नातेवाइकांसोबत ओमची ओळख करून दिली. दुसऱ्या दिवशी अनोळखी मोबाइल क्रमांकावरून ओमच्या मोबाइलवर फोन आला. ओमने तो उचलला असता, त्याला समोरून ‘तु ‘तिच्या’शी का बोलला, मला तुला भेटायचे आहे, असे मोबाइलधारक म्हणाला. मात्र, ओमने त्याला भेटण्यास टाळले.

त्यामुळे मंगळवारी (ता.२१) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तरुणीने ओमच्या व्हॉट्सॲपवर मॅसेज केला. यावेळी तरुणीने ओमला मोबाइलवर लोकेशन पाठवून विज्ञान गार्डन येथे भेटायला बोलाविले. ओम, त्याचा मित्र अनुज व अन्य एकासोबत विज्ञान गार्डन येथे गेला. तेथे तरुणी व सचित त्याला भेटले. सचितने ओमला शिवीगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली. ओमच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता अन्य सात ते आठ जण तेथे आले.

त्यांनी ओमसह त्याच्या मित्रांना मारहाण केली. तितक्यात सचितने चाकू काढून ओमवर वार करण्यास सुरुवात केली. ओम जखमी झाल्याचे दिसताच, त्यांनी तेथून पळ काढला. ओमच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ओमने दिलेल्या तक्रारीवरून चौकशी करीत, पोलिसांनी युवतीसह दहाही जणांवर गुन्हा दाखल केला. हुडकेश्वर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

Latest Marathi News Live Update : पाषाण तलावातील मृत मासे प्रकरण! महापौरांचा दौरा, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे आदेश

गरोदर असूनही ‘राका’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण करणार अ‍ॅक्शन सीन ! अभिनेत्रीची विशेष मेहनत

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये मराठमोळ्या श्वेता साकोडेची दमदार एन्ट्री; महाराष्ट्रीयन पदार्थांनी जिंकली परीक्षकांची मनं

Management Education: मॅनेजमेंट शिक्षणातील 'जेंडर गॅप': महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी बिझनेस स्कूल्स उचलत आहेत मोठी पावले

SCROLL FOR NEXT