atyachar atyachar
नागपूर

पतीच्या मित्राने केला बलात्कार; फोटो व्हायरल करण्याची धमकी

अनिल कांबळे

नागपूर : नेहमी घरी येणाऱ्या पतीच्या मित्राची वाईट नजर पत्नीवर पडली. पती घरी नसताना वारंवार घरी येऊन तिचे अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला. त्याच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी मैत्रीचा गैरफायदा घेणाऱ्या आरोपीला अटक केली. मोहम्मद तौहसिक मोहम्मद अब्दूल रफीक अन्सारी (२५, रा. यशोधरानगर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय महिला रिया (बदललेले नाव) ही पतीसह यशोधरानगरात राहते. दोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला असून एका वर्षाचा मुलगा आहे. तिच्या घराशेजारी मो. तौहसिक राहतो. तो रियाच्या पतीचा बालपणीचा मित्र आहे. दोघेही हातमजुरी करतात. दोघांनाही दारूचे व्यसन आहे. दोघेही नेहमी सोबत कामावर जातात तसेच एकमेकांच्या घरी येणे-जाणे आहे.

काही महिन्यांपासून रिया आणि तिच्या पतीमध्ये घरगुती कारणावरून वाद होत होता. तो पत्नीला मारहाण करीत होता. तौहसिक हा नेहमी घरी येत असल्यामुळे त्याच्यावर कुणाचा संशय नसायचा. पतीसोबत घरी येत असताना त्याची रियावर वाईट नजर पडली. त्यामुळे तो मित्र घरी नसतानाही घरी येत होता. शेजाऱ्यांना संशय नसल्यामुळे त्याचे फावत होते.

ऑगस्ट महिन्यात रिया आणि पतीमध्ये वाद झाला. त्याने पत्नीला मारहाण केली आणि घरातून निघून गेला. रिया रडत असताना तौहसिक घरी आला. त्याने तिला सांत्वना दिली. त्याने तिला रडत असताना बाहूपाशात घेतले आणि फोटो काढला. त्याकडे मात्र रियाचे लक्ष नव्हते. त्यानंतर तो बाहुपाशात असलेला फोटा दाखवून तिला ब्लॅकमेल करायला लागला. रियाने फोटो डिलीट करण्यास सांगितले असता त्याने थेट शारीरिक संबंधाची मागणी केली. परंतु, तिने नकार दिला.

फोटो पतीला दाखविण्याची धमकी

आरोपी तौहसिकने फोटो पतीला दाखविण्याची धमकी दिली. पतीला फोटो दाखविल्यास तुझे लग्न तुटेल अशी भीती दाखवली. त्यामुळे एकदा शारीरिक संबंधाची मागणी केली. बदनामीला घाबरून रियाने त्याला होकार दिला. त्याने बळजबरी बलात्कार केली. त्यानंतर मात्र, तो वारंवार तिला शारीरिक संबंधाची मागणी करायला लागला. अनेकवेळा त्याने तिच्यावर घरात घुसून बलात्कार केला. त्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून रियाने पतीला प्रकार सांगितला. दोघेही यशोधरानगर पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तौहसिकला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT