Rape Rape
नागपूर

‘मला तुझी गरज आहे, माझ्याशी संबंध ठेव’; सासऱ्याचे कृत्य

अनिल कांबळे

नागपूर : शारीरिक संबंधास नकार देणाऱ्या प्रेयसीवर बळजबरी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न प्रियकराने केला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी सूरज हरी शाहू (३०, रा. काचीपुरा, रामदासपेठ) याच्यावर गुन्हे दाखल करून अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सूरज शाहू हा हॉटेलमध्ये शेफ म्हणून नोकरीला आहे. १९ वर्षीय युवती आणि तो एकाच शाळेत शिकत होते. तेव्हापासून त्यांची ओळख होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्याही प्रेमसंबंधाची वस्तीत चर्चा होती. काही कारणामुळे त्यांच्यात ब्रेकअप झाले. सूरजला दारूचे व्यसन लागले. त्यानंतर तो तिला भेटायचा आणि प्रेमसंबंध ठेवण्यासाठी बळजबरी करीत होता. त्यामुळे ती त्याला टाळत होती. तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. मात्र, सूरज हा तरुणीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करीत होता.

शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास तरुणी ही घरी एकटीच हजर होती. त्यावेळी सूरज हा घरी आला. ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू माझी आहेस’ असे म्हटले. तरुणीने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला असता तो तिच्या अंगावर धावून आला. त्याचप्रमाणे तिच्याशी शारीरिक संबंधासाठी बळजबरी करायला लागला. तिने नकार देताच मारहाण केली. ‘मी तुला सोडणार नाही’ असे बोलून त्याने तिच्याशी अश्‍लील चाळे करीत विनयभंग केला. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी सूरज यास अटक केली.

सुनेवर बळजबरीचा प्रयत्न

घरात एकटी असल्याचे बघून सासऱ्याने सुनेला शारीरिक संबंधाची मागणी करीत बळजबरी करण्याचा करीत विनयभंग केला. याप्रकरणी वाडी पोलिसांनी सासऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सून आणि सासरा हे एकाच घरात परंतु, वेगवेगळे राहतात. शुक्रवारी रात्री ११०.३० च्या सुमारास सुनेने पतीसोबत जेवण केले आणि ती घरात बसली. त्यावेळी तिचा पती हा घराबाहेर गेला होता.

सासरा हा खोलीतून निघून सुनेकडे एकटक पाहत होता. त्यामुळे सून घरात किचनमध्ये निघून गेली. तिच्या मागोमाग सासरा देखील घरात आला. ‘मला तुझी गरज आहे, माझ्याशी संबंध ठेव’ असे बोलून सुनेला पकडण्याचा प्रयत्न केला. सासऱ्याला दूर लोटून नकार देत सूनेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिचे केस पकडून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी वाडी पोलिसांनी सासऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST चा मोठा निर्णय! बसचालकांवर आता साध्या वेशातील अधिकाऱ्यांची नजर राहणार, कारण काय?

Melatonin: शांत झोपेचे रहस्य! शरीरातील मेलाटोनिन हार्मोन नक्की काय काम करते ?

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये पुन्हा आंदोलन, आदित्य-अमित ठाकरे उपस्थित

Chas Dam Flood Release: चास कमान धरणातून २९,७९३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; ९९ टक्के भरलेले धरण, भिमा नदीला पूरस्थिती

Panvel News: एमएमआरडीएला मोठा झटका! पालिकेने १,२६० कोटींच्या निधीचा प्रस्ताव फेटाळला

SCROLL FOR NEXT