नागपूर

सहा वर्षीय मुलाचे अपहरण; लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ओळखीच्या असलेल्या दांपत्याच्या सहा वर्षीय मुलाचे एका युवकाने अपहरण केले. त्याला निर्जन ठिकाणी नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असताना नागरिकांना त्याला बघितले. नागरिकांनी त्याची चांगली धुलाई करीत पोलिसांच्या ताब्यात दिले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली. सोनू छेडी यादव (२५, बडवी, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) असे या नराधमाचे नाव आहे.

सोनू यादव हा सात आठ दिवसांपूर्वी कामासाठी नागपूरला आला होता. गजानननगर येथे भाड्याने खोली घेऊन तो रहात होता. पीडित मुलाच्या आईवडिलांचे राजीवनगर येथे चहा नास्त्याचे दुकान आहे. त्यामुळे मुलगा देखील दुकानाच्या आजूबाजूलाच खेळत असतो. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास आरोपी सोनू हा मुलाच्या दुकानात आला. तुला चॉकलेट आणि कुरकुरे घेऊन देतो असे मुलाला आमिष दाखवून पळवून नेले.

राजीवनगर येथील वाघधरा नाल्याजवळ एका झुडपात त्याने मुलाला नेले. मुलाच्या अंगातील कपडे काढत असताना हा प्रकार त्याच परिसरात राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आला. त्यामुळे लोक घटनास्थळी आले. त्यांनी सोनूला काय करतोस अशी विचारणा केली. परंतु, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने लोकांचा संशय बळावला. लोकांनी सोनूला पकडून बेदम चोप दिला. लोकांपैकी काहीजण मुलाच्या आईवडिलाला ओळखत होते. त्याच लोकांनी ही माहिती मुलाच्या आईला दिली. याप्रकरणी मुलाच्या आईच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अपहरण आणि पोक्सो अन्वये गुन्हा नोंदवून सोनू यादव यास अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर; अशक्य वाटणाऱ्या कल्पनेला वास्तवात आणलं...

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मेट्रो डब्यांची संख्या वाढणार, घाटकोपर-वर्सोवादरम्यान सहा डब्यांची ट्रेन धावणार

Japanese Hair Care: जपानी महिलांच्या सिल्की-शायनी केसांचे रहस्य काय? १ रुपयाही खर्च न करता ट्राय करा 'या' ६ सोप्या ट्रिक्स...

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

SCROLL FOR NEXT