नागपूर

१५ वर्षीय मुलगी ५ महिन्यांची गर्भवती; प्रियकराविरुद्ध गुन्हा

अनिल कांबळे

नागपूर : पानठेलाचालक युवकाने १५ वर्षीय मुलीला जाळ्यात ओढून सलग चार महिने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती पाच महिन्यांची गर्भवती झाली. त्यानंतर मात्र युवकाने तिला घरात कोंडून ठेवले. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली आहे. इस्लाम खान नासीर खान (वय २१, रा. कसानपुरा, हंसापुरी) असे युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलगी मूळची अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. कामाच्या शोधात तीन वर्षांपूर्वी तिची आई तिला घेऊन नागपुरात आली. त्यांनी मोमिनपुरा परिसरात खोली भाड्याने घेतली. आई मजुरीचे काम करीत होती. आईसोबत बाजारात ये-जा करताना इस्लामसोबत तिची ओळख झाली. इस्लाम हा मोमिनपुरा परिसरात पानठेला चालवतो. यातून त्यांची मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

हा प्रकार आईला समजल्यानंतर विरोध केला. यामुळे मुलगी आईशी भांडू लागली. पाच महिन्यांपूर्वी ती अचानकपणे घरातून निघून गेली. आईने चौकशी केली असता ती आरोपीसोबत पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तांडापेठ परिसरात राहात असल्याचे समजले. मुलगी आरोपीशी विवाह करण्याची मागणी करीत असताना तो टाळाटाळ करीत होता.

ती पाच महिन्यांची गर्भवती झाली व प्रकृती खालावत गेली. त्यामुळे तिला डागा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचे वय विचारात घेता डॉक्टरांनी प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पाचपावली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे यांनी आईला माहिती दिली. तिच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

आंधळ्या प्रेमाने केले उद्धवस्त

१५ वर्षीय मुलगी इस्लामच्या प्रेमात पडली. इस्लामने तिचा गैरफायदा घेत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इस्लामच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीने आईशी वाद घालत आंधळ्या प्रेमासाठी घर सोडण्याची तयारी केली. इस्लामने तिला किरायाच्या रूममध्ये ठेवले. गर्भधारणेमुळे तिची प्रकृती खालावल्यामुळे इस्लामने तिच्याकडे दुर्लक्ष केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT