atyachar atyachar
नागपूर

प्रियकराचे लग्न; गर्भवतीने दिली बलात्काराची तक्रार

तिने शहजादकडे वारंवार लग्नाचा तगादा लावला. परंतु, तो टाळाटाळ करीत होता

अनिल कांबळे

नागपूर : वस्तीत राहणाऱ्या महिलेसोबत दोन वर्षे प्रेमसंबंध ठेवल्यानंतर लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची तयारी करणे प्रियकराला चांगले भारी पडले. तीन महिन्यांची गर्भवती (Three months pregnant) असलेल्या महिलेने लगेच पोलिस स्टेशन गाठून प्रियकराविरुद्ध बलात्काराचा (Atrocities on women) गुन्हा दाखल केला. शेख शहजाद शेख जफ्फार (२६, रा. सक्करदरा) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय महिलेचे पहिले लग्न झाले होते. दोन वर्षे पतीसह सुखी संसार केल्यानंतर तिचे युवकाशी प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे ती पतीला सोडून माहेरी आली. माहेरी आल्यानंतर तिचे शेख शहजाद याच्याकडे कामावर असतानात सूत जुळले. अविवाहित असलेल्या शेख शहजादने तिला जाळ्यात ओढून आठ महिन्यांपासून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित (Atrocities on women) केले. त्यातून ती तीन महिन्यांची गर्भवती (Three months pregnant) झाली.

तिने शहजादकडे वारंवार लग्नाचा तगादा लावला. परंतु, तो टाळाटाळ करीत होता. दरम्यान, शहजादच्या घरी त्याला बघायला स्थळे यायला लागली. त्यामुळे ती आणखी चिडली. तिने शहजादला गर्भवती असल्याचे सांगून लग्नाची गळ घातली. मात्र, त्याने नात्यातील मुलगी बघून लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महिलेने सक्करदरा पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार (Atrocities on women) केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT