‘बसपन का प्यार’ फेम सहदेव अपघातात जखमी; डोक्याला पडले चार टाके

Sahadeva Dirdo
Sahadeva DirdoSahadeva Dirdo

‘बसपन का प्यार’ या गाण्याने प्रसिद्ध झालेला छत्तीसगडचा मुलगा सहदेव दिर्दो हा मंगळवारी (ता. २८) रस्ता अपघातात जखमी झाला. सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी सहदेवला जगदलपूरला रेफर करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी विनीत नंदनवार यांनी जिल्हा रुग्णालयात पोहोचून डॉक्टरांशी चर्चा केली. त्याचवेळी एसपी सुनील शर्मा यांनी जिल्हा रुग्णालयात पोहोचून सहदेवच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि डॉक्टरांशी चर्चा केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सहदेव हा वडिलांसोबत दुचाकीवरून कुठेतरी जात होते. दुचाकीवर तीन जण होते. सहदेव मागे बसला होता. ते शबरीनगरजवळ पोहोचला असता दुचाकी स्लीप झाली आणि सर्वजण खाली पडले. या अपघातात सहदेव गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवरील अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले. सहदेवला तातडीने सुकमा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जगदलपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. सहदेवच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.

Sahadeva Dirdo
दिल्लीत पुन्हा निर्बंधांचे दिवस! मुख्यमंत्र्यांकडून यलो अलर्ट जाहीर

बादशाहने रिमिक्स केले

छत्तीसगडमधील सहदेवचे बालपणीचे प्रेम मेरा भूल नहीं जाना रे हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. नक्षलग्रस्त भागातील पेंडलनार शाळेत इयत्ता पाचवीत शिकत असताना २६ जानेवारीच्या तयारीदरम्यान सहदेवने हे गाणे गायले होते. त्याने शाळेत गायलेल्या या गाण्यावर अनेकांनी रील्स बनवले आहेत. प्रसिद्ध रॅपर बादशाहनेही सहदेवच्या या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन तयार केले आहे. या व्हिडिओत सहदेवही बादशाहसोबत दिसत होता. याशिवाय सहदेवच्या या गाण्यावर अनेक सेलेब्सनी इन्स्टाग्रामवर रिल्स केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com