नागपूर

दिवसाढवळ्या महिलेवर तलवारीने हल्ला; मुलांवरील वारही झेलले हातावर

योगेश बरवड

नागपूर : दुचाकीवरून आलेल्या दोन बुरखेधारी आरोपींनी महिला आणि तिच्या मुलांवर तलवारीने वार केले. महिलेनेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. स्वतःवर होणारे वार ती हुकवीत होती, तर मुलांवरील वार हाताने झेलले. यात ही गंभीर जखमी झाली. मुलांना घेऊन शेजाऱ्याच्या घरात आश्रय घेतल्याने तिघेही थोडक्यात बचावले. शुक्रवारी दुपारी अजनी हद्दीतील काशिनगरात ही थरारक घटना घडली.

श्रद्धा बावसे (३३, रा. काशीनगर, द्वारकापुरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांचे पती रिकव्हरी एजंट आहेत. श्रद्धा या ४ वर्षांची मुलगी काव्या व दीड वर्षाचा मुलगा सिद्धार्थला सोबत घेऊन मैत्रिणीकडे जाण्यास निधाल्या. दुचाकीवरू अगदी काही अंतर पुढे जाताच दोन बुरखेधारी आरोपी दुचाकीवरून आले. त्यातील एकाने मुलाला चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला. श्रद्धा यांनी त्यांना हटकले. यानंतर दोन्ही आरोपींनी जवळची तलवार काढून अचानक हल्ला चढविला.

दोन्ही आरोपींचा प्रतिकार मुलांवर होणारे वार आपल्या हातावर झेलले. जखमी अवस्थेतही प्रसंगावधान राखत दोन्ही मुलांना घेऊन शेजाऱ्यांच्या घरात शिरल्या. आरडा ओरड एकून शेजारी धावून आल्याने आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी जखमी श्रद्धा यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात नेले.

रात्री उशीरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी आरोपींचा सुगावा मिळविण्याचा प्रयत्न केला. गेल्या दोन दिवसांपासून आरोपी महिलेच्या मागावर असल्याचे बोलले जाते. घटनेमागील कारण अस्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत आज ठाकरेंचा मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही सहभागाची शक्यता

Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Horoscope 2027: २०२७ ठरणार खास! नोकरी, व्यवसाय अन् पैशांच्या बाबतीत मिळू शकतात मोठ्या संधी; ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार म्हणे

Sunetra Pawar: ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, अजितदादांचं नाव वापरू नका’; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना टोला

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

SCROLL FOR NEXT