Attempted to kill young man with a knife 
नागपूर

सावध व्हा : भांडणात मध्यस्थी करणे भोवले; थोडक्‍यात वाचला जीव, काय झाला प्रकार... 

अनिल कांबळे

नागपूर : एखाद्याने दाखविलेला चांगुलपणा त्यांच्याच अंगलट आल्याची बरीच उदाहरणे आपल्या अवतीभवती पहायला मिळतात. असाच प्रकार नुकताच नागपुरात उघडकीस आला. दुसऱ्यांच्या वादात मध्यस्थी करणे एका व्यक्‍तीला चांगलेच महागात पडले. आता पुढे कधीही कुणाच्याच भांडणात मध्यस्थी करायची नाही, असा धडाच त्या व्यक्‍तीला या प्रकरणातून मिळाला. जाणून घेऊया काय घडला प्रकार... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ते 25 वर्षे वयोगटातील युवक दुचाकीने धम्मदीपनगरातून जात होते. दरम्यान, एकाचा मोबाईल रस्त्यावर पडला. त्यांच्या मागे असलेल्या प्रशांतच्या दुचाकीचे चाक त्याच्या मोबाईलवरून गेले आणि मोबाईल फुटला. यावरून दोन्ही युवकांनी प्रशांतसोबत भांडण सुरू केले. प्रशांतने त्यांना मोबाईल दुरुस्त करण्यासाठी 500 रुपये दिले. प्रशांत हा अतुल यांचा भाडेकरू असल्याने आपल्या भाडेकरूंसोबत भांडण होत असल्याचे पाहून अतुलने या प्रकरणात मध्यस्थी केली. 

प्रशांतने मोबाईल दुरुस्तीसाठी पाचशे रुपये दिल्याने आता वाद वाढवू नका, असा सल्ला अतुलने भांडण करणाऱ्या दोन्ही आरोपींना दिला. आपल्या भांडणात हा का लुडबूड करतोय, असा समज करून ते दोघेही संतापले. दरम्यान अतुल पुढे निघून गेला. आरोपींनी दुचाकीने अतुलचा पाठलाग गेला. बुद्धविहाराजवळ अतुलला थांबवून त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि फरार झाले. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. 
 

थोडक्‍यात बचावला अतुल 


आरोपींनी अतुलवर चाकूने हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तो थोडक्‍यात बचावला. अतुल पंढरीनाथ जांभूळकर (47) असे जखमीचे पूर्ण नाव असून, ते धम्मदीपनगर, बिनाकी ले-आउट येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अतुलचा या भांडणाशी कोणताही संबंध नव्हता. पोलिसांनी अतुलचा भाडेकरू प्रशांत कोते (वय 35) च्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 
 

नीरीचे ओळखपत्र दाखवून सराफाला गंडा 


नागपूर : नीरीचे ओळखपत्र दाखवून महाठकबाज तोतया वैज्ञानिक आशुतोष महाजनने आणखी एका सराफाला गंडविल्याचे उघडकीस आले. सराफा तुषार शरद डवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी आशुतोषविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तुषार यांचे छोटा ताजबाग परिसरात डवरे ज्वेलर्स आहे. 14 फेब्रुवारीला आशुतोष दुकानात आला. त्याने 35 हजार रुपयांचे दागिने खरेदी केले. आशुतोष याने डवरे यांना वणीतील ऍक्‍सिस बॅंकेतील खात्याचा धनादेश दिला. डवरे यांनी धनादेश वटविण्यासाठी बॅंकेत दिला; मात्र तो वटला नाही. दरम्यान, आशुतोषला तहसील पोलिसांनी अटक केल्याचे डवरे यांना कळले. त्यांनी सक्करदरा पोलिसांत तक्रार दिली. आशुतोषविरुद्ध आतापर्यंत फसवणुकीचे चार गुन्हे दाखल आहेत. 

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT