Attempted suicide of a youth in the house of a married sweetheart Nagpur crime news 
नागपूर

पुणे ते नागपूर प्रवास फक्त विवाहितेसाठी; मात्र, नकार मिळताच प्रियकराने उचलला टोकाचा पाऊल

अनिल कांबळे

नागपूर : विवाहित प्रेयसीने पळून जाण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने हाताच्या मनगटाची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी बेलतरोडीत उघडकीस आली. दीपक संजय पाटील (२७, रा. येनगाव, ता. बोदवड, जि. जळगाव) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक पाटील हा पुणे येथे वाहनचालक आहे. त्याची फेसबुकच्या माध्यमातून बेलतरोडी येथे राहणाऱ्‍या २६ वर्षीय विवाहितेशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करीत असत.

जुलै २० मध्ये दीपक हा नागपूरला आला. तिने दूरचा नातेवाईक असल्याची ओळख पतीला करून दिली. पती कामावर गेल्यावर ते मौजमजा करीत होते. याची कुणकुण पतीला लागली. त्यामुळे त्यांनी प्रेमात अडसर नको म्हणून पळून जाऊन सोबत राहण्याचा निर्णय घेतला. ३० जुलै रोजी पती कामावर गेल्यानंतर दोघांनीही पळ काढला. सहा महिने दोघेही येनगाव येथे राहिले. दरम्यान, तरुणीच्या पतीने बेलतरोडी पोलिसात पत्नी पळून गेल्याची तक्रार केली. पोलिसांनी हरविल्याची तक्रार नोंदविली.

पोलिसांनी घातली समजूत

बेलतरोडी पोलिसांनी तरुणीचा शोध घेतला. पोलिसांनी तरुणीला आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तरुणीने नागपूरला येण्यास स्पष्टपणे नकार देत प्रियकरासोबतच राहण्याचा हट्ट केला. पोलिसांनी ही माहिती तरुणीच्या आई-वडिलांना दिली. त्यानंतर आई-वडिलांनी तिची समजूत काढून नागपूरला आणले. पती-पत्नीत समझोता झाल्याने पतीने तिला ठेवून घेतले.

हाताची कापली नस

चार दिवसांपूर्वी दीपक हा नागपूरला आला. तो तरुणीच्या घरीच मुक्कामी थांबला होता. दरम्यान, त्याने तरुणीला पुन्हा पळून जाऊन संसार थाटण्याचा  आग्रह केला होता. परंतु, तरुणीने त्याला स्पष्टपणे नकार दिला. सोमवारी तरुणी ही पतीसोबत बाहेर गेली होती. तरुणी सोबत येत नसल्याचे पाहून दीपकने चाकूने हाताच्या मनगटाच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुणी व पती घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT