atul londhe atul londhe
नागपूर

किरीट सोमय्यांना धक्का; अतुल लोंढे यांनी दाखल केली याचिका

राजेश चरपे

नागपूर : खोटेनाटे आरोप करून महाविकास आघाडीला बदनामी करणारे भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नागपूरमध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल केली आहे. लोंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांना याचिका दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र, सोमय्या यांचे बेछूट आरोप कायम असल्याने याचिका दाखल करून लोंढे यांनी त्यांना मोठा धक्का दिला आहे.

याचिका दाखल केल्यानंतर लोंढे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भाव ते विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. किरीट सोमय्या यांनी खाजगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील ४० टक्के शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के काँग्रेसला मिळतो असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे. त्यांना लगाम घालणे आवश्यक होते. याकरिता सोमय्या यांच्या विरोधात आपण याचिका दाखल केल्याचे अतुल लोंढे यांनी सांगितले.

अतुल लोंढे यांनी यापूर्वी ड्रग्स तस्कर आणि भाजपच्या नेत्यांचा संबंध असल्याचाही आरोप केला होता. ५० लाख घेऊन गुजरातमध्ये गेलेली इनोव्हा गाडीचा तपास करावा, या गाडीचा पत्ता असलेले रवींद्र कदम यांना ताब्यात घेतल्यास ड्रग्स विक्रेत्यांचे मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकते असेही त्यांनी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monsoon: मान्सून कोकणात, पण मुंबईत कधी? पुढील 4-5 दिवस कसं असेल हवामान? बाहेर पडण्याआधी चेक करा

प्लास्टिक सर्जरी चालू आहे का? पाच महिने झाले तरी झी मराठीच्या नायिकेच्या नाकावरची पट्टी हटेना; चाहते वैतागले

Latest Marathi News Update : कर्जमाफीवरून काँग्रेसचा संताप! बुलढाण्यात शासन आदेशाची होळी, सरसकट कर्जमाफीची मागणी

Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांकडे असतो पैसा अन् सक्सेस; पण आयुष्यात शांतता नसते, एकटेपणात प्रेमासाठी तरसतात

IND A vs SL A: ऋतुराज गायकवाडचा १०० व्या सामन्यात शतकी धमाका! द्रविड-गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी

SCROLL FOR NEXT