An average of one and a half hundred babies are born daily in Nagpur baby born news
An average of one and a half hundred babies are born daily in Nagpur baby born news 
नागपूर

दर दहा मिनिटाला हलतो पाळणा; नागपुरात दिवसाला सरासरी दीडशे बालकांचा जन्म 

राजेश प्रायकर

नागपूर : घरात बाळ आलं की कुटुंब दिवाळीच साजरी करताना दिसून येते. नागपुरात सहा वर्षांत दर दहा मिनिटांनी अशी दिवाळी साजरी केली जात आहे. नागपुरात दर दहा मिनिटाला एका बाळाचा जन्म होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. दिवसाला सरासरी दीडशे दाम्पत्य आई-बाबा होण्याचा आनंद साजरा करीत आहेत.

घरात बाळ आले की घरातील मंडळी त्याच्या अवतीभवती दिसतात. प्रत्येकजण त्याची काळजी घेताना दिसून येते. एकूणच घरामध्ये सोहळाच साजरा होतो. शहरात २४ तासांत सरासरी दीडशे कुटुंबीयांकडे हा सोहळा साजरा होत आहे. तासाला सहा दाम्पत्य पालक होण्याचा आनंद साजरा करीत आहे. २०१५ ते २०१९ पर्यंत शहरात तासाला मुलांच्या जन्माची सरासरी सहा आहे. परंतु, मागील वर्षी यात तासाला पाच मुलांच्या जन्माची नोंद करण्यात आली आहे.

मागील वर्षी बाळांच्या जन्मात घट झाली असली तरी सहा वर्षात सरासरी दहा मिनिटाला एका बाळाचा जन्म होत असल्याचे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबरमध्ये एकूण ४४ हजार ९७८ बालकांनी जन्म घेतला. मागील वर्षी २३ हजार २२८ मुले तर २१ हजार ७५० मुलींच्या जन्माची नोंद झाली. मात्र, त्यापूर्वी २०१५ ते २०१९ या वर्षांत दरवर्षी पन्नास हजारांवर बालकांनी जन्म घेतला.

२०१५ मध्ये २८ हजार ३९९ मुलांच्या तर २६ हजार ७५८ मुलींच्या जन्मासह एकूण ५५ हजार १५७ बाळांनी जन्म घेतला. २०१६ मध्ये २८ हजार २० मुले तर २६ हजार २४२ मुलींसह एकूण ५४ हजार २६२ बालकांनी जन्म घेतला. २०१७ मध्ये २८ हजार ९२४ मुले, २७ हजार १५५ मुलींच्या जन्मासह एकूण ५६ हजार ७९ बालकांच्या जन्माची नोंद करण्यात आली आहे.

२०१८ मध्ये २८ हजार ६७४ मुले तर २७ हजार २३ मुलींच्या जन्माची नोंद करण्यात आली. या वर्षात एकूण ५५ हजार ६९७ बाळांचा जन्म झाला. २०१९ मध्ये एकूण ५३ हजार ९१२ बाळांच्या जन्माची नोंद करण्यात आली असून यात २७ हजार ६०६ मुले तर २६ हजार ३०६ मुलींचा समावेश आहे.

वर्षनिहाय बाळांचा जन्म 

वर्ष प्रती दिवस जन्मलेल्या बाळांची संख्या 
२०१५ १५१ 
२०१६ १४८ 
२०१७ १५३ 
२०१८ १५२ 
२०१९ १४८
२०२० १२३


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT