B. A. Now in the course of this self-examination 
नागपूर

बी. ए. च्या अभ्यासक्रमात आता हे आत्मचरीत्र

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या मराठी अभ्यास मंडळाच्या बैठकीत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या "माझी जन्मठेप' या आत्मचरित्राचा बी. ए. च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यावरुन बराच मोठा वाद निर्माण झाला होता. अभ्यासमंडळाच्या काही सदस्यांनीही त्यावर आक्षेप घेतला होता. अभ्यासमंडळात शिक्षण मंचच्या सदस्यांचे बहुमत असल्याने त्यांनी आत्मचरित्र बी. ए. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि संघ परिवारातील विविध संस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर सावरकरांना भारतरत्न देण्यावरुनही देशात राजकारण पेटले. या सर्व पार्श्‍वभूमिवर संघ परिवारातील विविध संस्थांकडून सावरकरांचे जीवनपट उलगडणारे विविध कार्यक्रम,व्याख्याने, एकांकिकाचे आयोजन केले जात आहे. यातूनच काही महिन्यांपूर्वी बी. ए. अभ्यासक्रमात माझी जन्मठेप हे पुस्तक लागू करण्याचा प्रस्ताव अभ्यासमंडळाच्या बैठकीत मांडला होता. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये "माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र कादंबरी प्रकारामध्ये समाविष्ट केल्या गेले आहे. यावर इतर सदस्यांनी "माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र असून तो कादंबरी प्रकारात मोडत नसल्याचा आक्षेप नोंदविला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत, या आत्मचरित्राचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय अभ्यासमंडळाने घेतला. यामुळे नवीन शैक्षणिक वर्षापासून बी. ए. प्रथम वर्षाच्या साहित्य विषयामध्ये "माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहे.

शरद पवार यांच्या लेखाचा समावेश

अभ्यासक्रमात एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मचरित्राचा समावेश करण्यात आला असताना, दुसरीकडे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरील लेख बी. ए. प्रथम वर्षाच्या मराठी आवश्‍यक विषयामध्ये लागू होणार आहे. हा लेख राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लिहिलेला आहे हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bhide Bridge Killing : भिडे पुलाजवळ तरुणाचा गळा चिरून खून; पोलिसांनी 'असा' लावला छडा, हातावरील 'टॅटू'मुळं उलगडलं सत्य

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांचा संताप अनावर! कसायाचा थेट शिरच्छेद… गोवधावर असा बसवला कायमचा आळा

IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बेशुद्धावस्थेत अत्याचार अन् हत्या, आदल्या दिवशी विवाहितेशी बळजबरी संबंध; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

Donald Trump India China Controversy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला म्हटले "नरकाचे द्वार", वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जगभर संताप

Petrol-Diesel Price Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण!

SCROLL FOR NEXT