रंगभूषाकार, वेशभूषाकार, ध्वनी संयोजक, प्रकाश योजनाकार, नेपथ्यकार या ना अशा अनेकांमुळे सांस्कृतिक क्षेत्र अधिक समृद्ध होते. तंत्रज्ञानामुळे प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाची शोभा अधिक वाढते. 
नागपूर

...तर बॅकस्टेजला काम करणारे तंत्रज्ञ वळतील गुन्हेगारीकडे; कोरोनामुळे आली उपासमारीची वेळ 

केतन पळसकर

नागपूर : कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कला क्षेत्राला हातभार लावणारे तंत्रज्ञसुद्धा आर्थिक संकटात आहेत. समाजामध्ये मानाने मिरविणाऱ्या या कलावंतांवर आपला स्टारडम बाजूला ठेऊन मदत मागायची वेळ आली आहे. हे असेच चालू राहिल्यास काम न मिळाल्यामुळे तंत्रज्ञ गुन्हेगारीकडे वळतील, अशा भावना सांस्कृतिक क्षेत्रातील तंत्रज्ञ मंडळींनी 'दै. सकाळ'कडे व्यक्त केल्या.

रंगभूषाकार, वेशभूषाकार, ध्वनी संयोजक, प्रकाश योजनाकार, नेपथ्यकार या ना अशा अनेकांमुळे सांस्कृतिक क्षेत्र अधिक समृद्ध होते. तंत्रज्ञानामुळे प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाची शोभा अधिक वाढते. रंगमंचावरील कलावंताप्रमाणेच तंत्रज्ञ मंडळीही कार्यक्रमांसाठी पूर्णवेळ झटत असतात. 

ऑन स्टेज कलावंतांच्या तुलनेत 'पर डे' जरी कमी मिळत असला तरी कौशल्यपूर्ण काम करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मात्र, आज हे तंत्रज्ञ अतिशय मोठ्या संकटातून जात आहेत. त्यामुळे, 'मदत नको, काम द्या' असे साकडे हे लोक प्रशासनाला घालत आहेत.

कोरोनाचे संकट शमायला तयार नाही. रोजच्या कमाईवर आमचे घर चालते. रोज सकाळी उठल्यावर प्रश्न पडतो की आज काम कोणते करायचे. काम नसल्याने मानसिक स्थिती बिघडत आहे.
-लालजी श्रीवास, 
रंगभूषाकार.

मी वीस लोकांना रोजगार देतो. माझ्यासाठी त्यांना पूर्ण पगार देणे कठीण झाले आहे. आम्हाला फक्त काम पाहिजे. तंत्रज्ञांना काम न मिळाल्यास एक तर ते आत्महत्या करतील; नाही तर गुन्हेगारीकडे वळतील.
-मिथुन मित्रा, कोषाध्यक्ष, 
विदर्भ लाईट्स ओनर्स असोसिएशन.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut statement : सुनेत्रा पवार यांच्या शपविधीवर संजय राऊत म्हणाले, 'शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य योग्यच'

Congress–BJP Joint Group: काँग्रेस-भाजपचा संयुक्त गट स्थापन... मालेगाव महापालिकेत अनपेक्षित राजकीय घडामोड

Latest Marathi News Live Update : सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीला

Realme P4 Power 5G सुपर स्मार्टफोन लाँच! 10,001mAh बॅटरी असलेला भारतातील पहिला मोबाईल; पाहा दमदार फीचर अन् एवढीशी किंमत

चारचौघी नाटकानंतर मुक्ता आणि रोहिणी हट्टंगडी 'या' सिनेमात दिसणार पुन्हा एकत्र !

SCROLL FOR NEXT