balasaheb thackeray gorewada zoo sakal
नागपूर

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची मांदियाळी; दीड लाख पर्यटकांनी दिली भेट

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात गेल्या दीड वर्षात १ लाख ६० हजार ६८५ पर्यटकांनी भेट दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात गेल्या दीड वर्षात १ लाख ६० हजार ६८५ पर्यटकांनी भेट दिली आहे.

नागपूर - बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात गेल्या दीड वर्षात १ लाख ६० हजार ६८५ पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे गोरेवाडा प्रकल्पाच्या तिजोरीत ५ कोटी ६० लाख रुपयांचे उत्पन्न जमा झाले. त्यात जून महिन्यात १८ हजार २५० पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे अनेक महिने प्राणिसंग्रहालय पूर्णपणे बंद होते, हे विशेष.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत २६ जानेवारी २०२१ रोजी या प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यात ब्रेक लागला. येथे फेब्रुवारी २०२१ दहा हजारांवर पर्यटकांनी भेट देऊन वाघासह अस्वलांना पाहण्याच्या आनंद लुटला. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. एप्रिल, मे आणि जून मध्ये पर्यटन बंद होते. तसेच अंतर्गत रस्ते पावसामुळे खराब झाल्याने काही दिवस पर्यटन बंद होते.

नोव्हेंबरमधील दिवाळीच्या सुटीत गोरेवाडा प्रशासनावर पर्यटकांचा भार वाढल्याने बाहेरून दोन वाहने घेऊन सोडण्यात आली होती. या महिन्यात सर्वाधिक १६ हजार ६५३ पर्यटकांनी भेट दिली. ४४ लाख १९ हजार रुपयांचे सर्वाधिक उत्पन्न मिळाले. दररोज एक ते दीड हजार पर्यटकांना प्रवेश न मिळाल्याने आल्यापावली परतावे लागत असल्याने अनेकांच्या या उद्यानातील साहेबराव आणि ली या दोन वाघाच्या दर्शन घेता न आल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले.

नोव्हेंबर महिन्यात दिवाळी होती. त्यामुळे सुटीचा आनंद लुटण्यासाठी अनेकांनी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील वन्यप्राण्यांचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. नागपूरसह विदर्भातील पर्यटकांचे हे नवे डेस्टिनेशन झाले आहे. डिसेंबर २०२१, जानेवारी फेब्रुवारी, मार्च आण एप्रिल महिन्यात ३६ हजार १३३ पर्यटकांनी भेट दिली. मे महिन्यात १५ हजार ७२० तर जून महिन्यात सर्वाधिक १८ हजार २५०पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. अद्यापही पर्यटन सुरु आहे. शासकीय सुटी आणि रविवारी पर्यटकांची पावसाळ्यातही वन्यजीव दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे.

महिना पर्यटकांची संख्या

सप्टेंबर ७,८४२

आक्टोबर १३,७४०

नोव्हेंबर १६,६५३

डिसेंबर १,९८९

जानेवारी ६,९३५

फेब्रुवारी ६,६५१

मार्च ११,४२०

एप्रिल ९,१३८

मे १५,७२०

जून १८,२५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

SCROLL FOR NEXT