balasaheb thorat says Accelerate pending revenue works 
नागपूर

महसूलमंत्री थोरात म्हणाले, कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात असून प्रलंबित महसुली कामांना गती द्या

नीलेश डोये

नागपूर : कोरोनाच्या प्रकोपामुळे दैनंदिन जीवनासह शासकीय कामकाजही मधल्या काळात प्रभावित झाले. आता कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात असून कोरोना काळातील प्रलंबित महसुली कामांना गती देण्याचे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.

थोरात यांनी प्रारंभी नागपूर विभागातील कोरोनाची माहिती जाणून घेतली. विभागातच नव्हे तर राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग व मृत्यू कमी झाले आहे. तरीही गाफील राहून चालणार नाही. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यादृष्टीने आरोग्ययंत्रणेसोबतच प्रशासनाने सतर्क असावे, असे ते म्हणाले.

पालकमंत्री नितीन राऊत यांनी देखील कोरोनाच्या संभाव्य लाटेस तोंड देण्यासाठी आरोग्य व्यवस्था सज्ज असल्याचे सांगितले. विभागातील पीक पाणी, पूर परिस्थितीचे निधी वाटप, झुडपी जंगलाविषयी ही माहिती घेतली. नागपूर विभागातील सातबारा संगणकीकरण ९९ टक्के पूर्ण झाले ही समाधानाची बाब आहे. मात्र, जमीन अकृषी करण्याची नियमावली सोपी करण्याबाबत महसूल विभागातील अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात.

वाळू लिलाव, प्रलंबित फेरफार नोंदी, महाराजस्व अभियानात केलेली काम, राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन मोबदला आदींबाबत ही अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. बैठकीला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपायुक्त सुधाकर तेलंग, उपायुक्त मिलिंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची, निशिकांत सुके, अविनाश कातडे, रवींद्र कुंभारे उपस्थित होते.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Mayor Tenure : कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! महापौरपदाचा कालावधी 10 महिने की सव्वा वर्ष? खासदार महाडिकांनी थेट मुख्यमंत्र्यांचा निरोपच सांगितला

Last Shivratri 2026: डिसेंबरमध्ये साजरी होणार वर्षातील शेवटची शिवरात्री; जाणून घ्या तारीख, निशिता मुहूर्त, महत्त्वाच्या वेळा आणि शुभ योग

NCP SP Delimitation Decision: सुप्रिया सुळेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी का मारली? पाठिंब्याचा निर्णय होणार का?, अमोल कोल्हेंनी दिली अधिकृत माहिती

Marathi News Live Updates : बांधकाम कामगारांच्या मोफत ब्लँकेटची २०० रुपयांना विक्री,दोघांना अटक

OTT वर या आठवड्यात मनोरंजनाचा धमाका! 'दृश्यम: द कन्क्लूजन'पासून 'हनुमान अंश'पर्यंत, पाहा 5 नवे चित्रपट; जाणून घ्या कुठे पाहता येणार?

SCROLL FOR NEXT