Liquor party Liquor party
नागपूर

३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवर नागपुरात बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी चांगलीच तयारी केली होती. ३१ डिसेंबर म्हटले तर मद्यपींसाठी जणू पर्वणीच असते. मात्र, नागपुरात दारू पिण्यासाठी परवाना लागणार होता. आता हा आदेश फिरवून ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवर जिल्हा प्रशासनाने बंदीचे आदेश काढले आहे. यामुळे नागपूरकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे. (Ban on parties on December 31 in Nagpur)

कोरोना आणि ओमिक्रॉनचा धोका पाहता जिल्हाधिकारी विमला आर. यांनी हे आदेश (Collectors order) काढले आहे. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत पार्टी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशानंतरही पार्ट्यांचे आयोजन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या स्वागताची पाच रुपयांत एक दिवसाचा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून दिला जाणार होता. यासाठी ऑनलाइन आणि ऑनलाइन अशी व्यवस्था करण्यात आली होती. मद्याच्या दुकानात (Liquor) ऑनलाइन परवाना मिळणार होता. तसेच पार्टी करायची असेल तर तीन ते तीस हजार शुल्क आकारून परवाना घ्यावा लागणार होता. परवाना शिवाय मद्य खरेदी किंवा पार्टी आयोजित केली तर कारवाई केली जाणार होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT