bank will closed four days due to strike  
नागपूर

आजपासून बँका चार दिवस बंद, ग्राहकांना बसणार फटका

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : बँकांच्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक यूनियनने १५ आणि १६ मार्च रोजी बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. आज दुसरा शनिवार आणि १४ ला रविवार आहे. दोन दिवसाचा संप यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या झेंड्याखाली संघटित १०० टक्क बँक कर्मचारी तसेच अधिकारी दोन दिवसाच्या संपावर जात आहेत. हा संप सामान्य माणसाच्या बचतीच्या सुरक्षिततेसाठी आहे, असे युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सचे निमंत्रक देविदास तुळजापूकर यांनी कळविले आहे. 

बँका बंद असल्यामुळे ग्राहकांना शनिवारपासून सलग चार दिवस व्यवहार करता येणार नाहीत. त्याचा फटका आर्थिक उलाढालीला बसणार असून कोट्यवधींची उलाढाल प्रभावित होणार आहे. मार्च महीना आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने व्यापाऱ्यांसह सामान्य ग्राहकांची गर्दी अधिक असते. मात्र, शासकीय सुट्या व संपामुळे सर्व व्यवहार चांगलेच प्रभावित होणार आहेत. या दरम्यान एटीएम सेवा सुरू राहणार आहे, असे बँकांनी स्पष्ट केले आहे. तरीही या संपामुळे ग्राहकांना फटका बसणार हे निश्चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

Maharashtra Politics : ऑपरेशन ‘बुडवा’; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नव्या वळणावर उभा

Lohgad Ketan Agarwal Death Case : पावसात लोहगडावर चेतन चौधरीकडून सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग

Kolhapur Child Death : अवघ्या 4 दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस, खेळता खेळता 4 वर्षांच्या रियांशचा गोबर गॅसच्या टाकीत पडून मृत्यू; साबळेवाडीतील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT