bank  
नागपूर

नागरिकांनो, वर्धा जिल्ह्यातील बॅंकाच्या वेळा बदलल्या; दुपारी 2 वाजेपर्यंतच चालणार कामकाज

सकाळ डिजिटल टीम

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सावधगिरी म्हणून बॅंकांच्या वेळा बदलविल्या आहेत. या बदललेल्या वेळेनुसार बॅंका आता सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. यामुळे नागरिकांची सध्या बॅंकांत गर्दी होत आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अनेक बॅंकांतील कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचे पुढे आले आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून बॅंक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने निर्णय घेत बॅंकांचा कालावधी कमी केला आहे. यामुळे नागरिकांना त्यांचे व्यवहार करण्याकरिता त्रास होत असल्याचे दिसून आले.

बऱ्याच दिवसांच्या सुटीनंतर आज सकाळी बॅंकांचे कामकाज सुरू झाले. यात बॅंकेत गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांना बॅंकेच्या द्वारावर अडवून एकाएकाने बाहेर सोडण्यात आले. यामुळे बाहेर चांगल्याच रांगा लागल्या होत्या. ग्राहकांना बाहेर थांबण्यास सांगण्यापूर्वी त्यांच्याकरिता येथे व्यवस्था करणे ही बॅंक प्रशासनाची जबाबदारी होती.

परंतु वर्ध्यात तसे काहीच झाले नसल्याचे दिसून आले आहे. बॅंकेच्या आत जरी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा प्रयत्न असला तरी बाहेर या नियमांच्या पुरत्या चिंध्या झाल्याचे दिसत होते.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: गरिबांचे हक्क हिरावणाऱ्या बिल्डरांना सोडणार नाही: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; प्रसंगी तपास ‘ईडी’कडे देणार!

Balasaheb Thorat: राहुरीत काँग्रेसचाच उमेदवार देणार: बाळासाहेब थोरात; पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येणार!

Sankeshwari Mirchi Rate : संकेश्वरी मिरची दराचा ‘जोर का झटका’, किलोला १९०० रुपये; इतिहासातील उच्चांकी दर

Latest Marathi News Live Update : नांदेड शहरात 24 तासात चौथा खून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

'ऐश्वर्या चालते तेव्हा मला फार भिती वाटते' बायकोबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?

SCROLL FOR NEXT