कामठी : चोरट्यांनी अस्ताव्यस्त केलेले कपाटातील साहित्य.  
नागपूर

सावधान ! आता चोरांनाही वाटत नाही बरं कोरोनाची भीती, कशी ते वाचा....

सतिश डहाट

कामठी (जि.नागपूर) :  सद्या कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने सगळीकडे चिडीचिप आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळयांच्याच मनात या आजाराच्या भीतीने घर केले आहे. कोणतेही शहर वा ग्रामीण परिसर पहा कोरोनाशिवाय काहीच ऐकायला मिळत नाही. कोरोना पॉझिटिव्ह निघताच पोलिस, अधिकारी सगळे कामी लागतात. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह निघाल्यापासून परिसराला सील लावणे, रूग्णाच्या उपचाराची व्यवस्था करणे, संपर्कातील संशयीतांना शोधणे, त्यांना क्‍वारंटाईन करण्यापर्यंतची सर्व कामे प्रशासनाला पार पाडावी लागतात. हे सगळे झाले ज्यांना आपल्याबरोबर इतरांच्या प्रकृतीची काळजी असलेल्यांसाठी. परंतू अशा संधीच्या शोधात असलेल्या चोरट्यांचे काय? कामठी शहरात मात्र या चोरट्यांनी एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असताना त्याच्या घरी जाऊन चक्‍क डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला. आता काय म्हणावे या चोरट्यांना?

अधिक वाचा :गोगलगाय पोटात पाय, झाडावर चढते अन्‌ करते काय? वाचाच...

पतीपत्नी घेत होते रूग्णालयात उपचार
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविदासनगर येरखेडा येथील शितला माता मंदिरासमोर राहणारे सेवानिवृत्त रेल्वे स्टेशन मास्टर मोतीलाल कालूराम शिमले यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना कोरोनामुळे मेयो रूग्णालयात उपचारासाठी तर मोतीराम शिमले यांना प्रशासनाने22जुलैला पाचपवली नागपूर येथील कॉरोंटाईन सेंटरमध्ये क्‍वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे राहत्या घरी कुलूप लावले होते. चोरटयांनी बंद घराचे22 ते25जुलै या कालावधीत दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाट फोडून कपाटातील सोन्याचे-चांदीचे दागिने, लॅपटॉप, दोन मोबाईल फोन असा एकूण11 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

अधिक वाचा  : कां आणि कशासाठी होमक्‍वारंटाईन होण्याची वेळ आली आमदार समीर मेघेंवर, वाचाच...

घरी येताच कळला प्रकार
शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास मोतीलाल शिमले घरी परत आले असता घराच्या पुढील दारावरील कुलूप तुटलेले दिसले. घरातील कपाट फोडले व सामान अस्ताव्यस्त पसरलेले दिसून आले. चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना कपाटातील सामानाची पुरेपूर माहिती नसल्याने मेयो रूग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्नीला फोन करून सामानाची माहिती विचारली. रात्रीच नवीन कामठी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनास्थळी दुय्यम पोलिस निरीक्षक राधेश्‍याम पाल, ठसे तज्ज्ञ, श्वानपथक यांनाही पाचारण करण्यात आले होते. घरफोडीचा पुढील तपास दुय्यम पोलिस निरीक्षक राधेश्‍याम पाल करीत आहेत. कामठी परिसरात चोरांना कोरोना महामारीची भीती नसल्याचे दिसून येत आहे.


संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Narwekar statement : अलिबाग येथे शेतकऱ्यांमधील वादाच्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा खुलासा

Maha Shivratri 2026 Song: नमो नमो शंकरा! कोट्यावधी चाहत्यांनी पाहिलं; तरीही पुन्हा ऐकावं वाटणारं भक्तिगीत

Latest Marathi News Live Update : महाशिवरात्रीनिमित्त कपिलेश्वर महादेव मंदिरावर फुलांची सुंदर सजावट

Maratha History : कोल्हापूरच्या छत्रपतींची समाधी पाकिस्तानच्या कराचीत कशी? मराठ्यांचा हा धगधगता इतिहास तुम्हाला माहिती असायलाच हवा

Nashik : त्र्यंबकेश्वरला जाताना भाजप खासदाराच्या कारला आग, काही क्षणात कार जळून खाक

SCROLL FOR NEXT